नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
दि. २९ एप्रिल रोजी रात्री ७ च्या दरम्यान मौ.तग्याळ येथील शेतकरी गोविंद विठ्ठल भिंगोले यांच्या घरावर वीज कोसळून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.अगोदरच अत्यंत गरीब असलेले हे कुटुंब,या संकटामुळे आज रस्त्यावर आले आहे.संकटात असलेल्या या कुटुंबाला रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराकडून भांडे,कपडे,धान्य या रूपाने तात्काळ मदतीचा आधार देण्यात आला आहे.या कुटुंबाजवळ असलेले सर्व जळून खाक झाले आहे.आज,अंगावरील कापड्याशिवाय या कुटुंबाजवळ काहीही नाही.त्यामुळे सुमठाणकर मित्र परिवाराने केलेली मदत म्हणजे,एक आधार आहे.यावेळी शिवशंकर पाटील कलंबरकर, रामदास पाटील मिञ परीवाराचे विनोद आपटे, राम सावळेश्वर,तग्याळचे सरपंच बालाजी पाटील गोपनर,विलास पाटील तग्याळकर,कुटूंब प्रमुख गोविंद विठ्ठल भिंगोले,दिपक गुमडे,पत्रकार संजय राचलवार,बालाजी घंटेलवाड,चंद्रकांत गुमडे,बालाजी उप्पे,विनायक भिंगोले,बालाजी भिकनर आदी.
या दुर्दैवी घटनेचा महसूल विभागाकडून पंचनामा केला आहे.यात 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा उल्लेख केला आहे.संकटात असलेल्या या भिंगोले कुटुंबाला प्रशासनाकडून तात्काळ नूकसानीची भरपाई देण्यात आली पाहिजे.अशी भावना सर्वाकडून व्यक्त केली जात आहे.प्रशासनाने या रस्त्यावर आलेल्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी तात्काळ कार्यवाही केली पाहिजे.

COMMENTS