नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील मौजे राजुरा (बु) प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हापरिषद सदस्या सौ. भाग्यश्री साबणे यांच्या प्रयत्नाने राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून आणलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पणाचा छोटेखानी समारंभ दि.२ रोजी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हापरिषद सदस्य (प्र) श्री विक्रम सुभाषराव साबणे यांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी राजुरा (बु) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैधकीय अधिकारी डॉ. माने मॅडम, पंचायत समिती सदस्य जे.बी.कांबळे ,शिवसेना उपतालुका प्रमुख गोपाळ पाटील राजूरकर, सरपंच शिवाजी राऊत, उपसरपंच हणमंतराव पाटील, युवासेना नेते सुधाकर सुरनर,राजुरा ग्रा. पंचायत सदस्य सौ.अनिता वाघमारे ,सुवर्णा इंगळे, आकाश राजुरे, राजाराम चंदावाड, प्रकाश इंगळे, सखुबाई वाघमारे, चंद्रकांत पुठ्ठेवाड,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातिल सर्व कर्मचारी उपस्थित होते, हि रुग्णवाहिका कोविड -19 च्या रुग्णांसह जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांमध्ये माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करण्यासाठी गरोदर माता आणि आजारी बालकांना मोफत वाहन संदर्भ सेवा आता या रुग्णवाहिकेच्या उपलब्धतेमुळे आणखी चांगल्या प्रकारे होणार आहे. याचबरोबर गरोदर मातांची मोफत तपासणीसाठी, लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हि रुग्णवाहिका उपयोगी येईल.
------------------------
राजुरा (बु) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सर्व उपकेंद्रापर्यंत अत्यंत कमी कालावधीत लसीकरणाचा साठा पोहचविणे, ग्रामीण भागातील, दुर्गम परिसरात तसेच परिसरात आरोग्य विषयक विविध सर्वेक्षण करण्यासाठी तात्काळ वैद्यकिय सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून हि शासकीय रुग्णवाहिका उपयोगी ठरणार आहे..
डॉ. माने मॅडम
वैद्यकीय अधिकारी
प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरा
---------------------------------

COMMENTS