धर्माबाद (अहमद लड्डा)
शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी 4 में रोजी धर्माबाद कोविडसेंटर ला भेट देऊन उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची विचारपूस करून त्यांना धीर दिला आहे
यावेळी त्यांच्या समवेत तालुकाप्रमुख आकाश रेडी, तालुका संघटक गणेश गिरी,शहरप्रमुख अनिल कमलाकर,साईप्रसाद पेकमवार, उपतालुकाप्रमुख संतोष पाटील मोरे आदीजन उपस्थित होते.
कोविडसेंटर मध्ये रुग्णांना समाधानकारक उपचार मिळत असल्याने जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी समाधान व्यक्त केले .व कोविडसेंटर ला सॅनिटाईझर भेट दिले.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सौ.पदमाताई सतपलवार यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजना ची माहिती तालुकाप्रमुख आकाश रेड्डी यांनी दिली.
या संकटात शिवसेना सर्व जनतेच्या सोबत आहे कुणालाही अडचणी आल्यातर आम्ही मदतीसाठी तत्पर आहोत असा विश्वास तालुकाप्रमुख आकाश रेड्डी यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS