*कोरोणाची लस घेतल्यानंतर आपल्या कुटुंबाला रक्ताची गरज पडल्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून मस्साजोगकरांनी केले श्रेष्ठ दान*
*अनंत जाधव /मस्साजोग*
*केज तालुक्यातील मस्साजोग येथील प्राथमिक उप आरोग्य केंद्रात दिनांक १ मे शनिवार रोजी राष्ट्रीय कामगार दिनानिमित्त व महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते*
तरी याबाबत ची अधिक माहिती अशी की मस्साजोग येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कामगारांचे खरे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रक्तदान करण्यात आले यात प्रवीण काथवटे,तुषार देशमुख,रवींद्र घाटूळ,सुदर्शन देशमुख, बाळकृष्ण शेळके,योगेश शिनगारे, समाधान वाघमारे, जाधव दत्तात्रय, भानुदास शिंदे, शेख रफिक, संभाजी गायकवाड, किरण सोनवणे, आकाश घाटूळ,भागवत काटकर,बालू काटकर, जालिंदर गायकवाड, मचिंद्र जावळे, रमाकांत जधाव, धनंजय देशमुख या तरुणांनी 51 (प्लेटलेट,प्लाझमा,पी.सी.व्ही ) बॅग तरूणांनी कोरोणाची लस घेण्याअगोदर ३० दिवसात आपल्या कुटुंबाला किंवा जवळच्या नातेवाईकांना रक्ताची गरज पडल्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडे रक्तदान करून रक्तसाठा करून ठेवुन महाराष्ट्र दिन व राष्ट्रीय कामगार दिन ग्रामपंचायतच्या वतीने साजरा करण्यात आला आहे यावेळी रक्तदान शिबीरात उपस्थित रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.सुजीत तुम्मोड, समाज सेवक अधिक्षक शशिकांत पारखे, तंत्रज्ञ जगदिश रामदासी, सहाय्यक शेख बाबा,वाहन चालक कचल कांबळे, पत्रकार अनंत जाधव , जिशान सय्यद इत्यादी उपस्थित होते .

COMMENTS