*पाथरी तहसीलचा कारभार अनागोंदी!* *साहेब तुम्ही भांडता!इतरांनी काय करावे* *जीवाची पर्वा"न"करता काम करणाऱ्या गुरुजींचा अवमान प्रकरण*

*भाग एक १* सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी मागील अनेक दिवसांपासून पाथरीच्या महसूल विभागाला वानवा लागली आहे.ही वानवा भरुन काढण्यासाठी तहसीलदार म्हणून ...


*भाग एक १*

सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी

मागील अनेक दिवसांपासून पाथरीच्या महसूल विभागाला वानवा लागली आहे.ही वानवा भरुन काढण्यासाठी तहसीलदार म्हणून श्रीकांत निळे यांची नियुक्ती झाली खरी!मात्र कौटुंबिक कामासाठी रजेवर असणाऱ्या निळे यांच्या जागी नायब तहसीलदार सुभाष कट्टे यांना पदभार मिळाला तसा प्रशासन"वाळूतून"चालवण्याचा अनुभव कट्टे यांना तहसीलदार उत्तम कांगणे यांच्यापासून मिळाला आहे.हा अनुभव काही साधा नाही तर खाजगी लोक तहसीलदारांच्या मर्जीने पोसून त्यांच्या माध्यमातून आर्थिक "म"च्या वसुलीत आपले हात काळे करण्याचा प्रकार चालू आहे.यात वेळोवेळी आपली मर्जी ठेऊन अवैध वाळूव्यवसायिक पोसण्यासाठी कट्टे जीवाचे राण करत असल्याची ओरड ग्रामीण भागातून होत आहे.यात मागील वर्षी कानसुर येथील एका तक्रारदारास तुम्हाला वाळूच्या तक्रारी करुन काय करायचे?चार दिवस जगा असे धमकीवाक्य कट्टे यांनीच बोलल्याची देखील चर्चा होत आहे.मागील वर्षीच्या कोरोना आजारापासून येथील महसूल प्रशासनात सर्व काही अलबेल असल्याचे चित्र दिसून येते. पाथरी महसूल प्रशासनाच्या माध्यमातून सर्वात जास्त कुळ कायदा सूनवणीसह इतर जमीन सुनावणी प्रकरणात येथील तहसील प्रशासनाने आपले उखळ पांढरे केले असल्याचे दिसून येते.याचबरोबर कोरोना काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खरे कोरोना योद्धे संबोधलेच पाहीजे यात गैर नाही.मात्र आपल्या मिळालेल्या संधीच्या जोरावर येथील तहसील प्रशासनातील नायब तहसीलदार तथा प्रभारी सुभाष कट्टे,खाजगी चालक सुनील पाटील,आसाराम शिंदे यांनी पाथरी तालुक्यात मद्यपान करुन सामान्य माणसाला माणूसपणाची नव्हे तर एखाद्या पशुप्रमाणे वागणूक देण्याचा पायंडा पाडला आहे.अधिक माहिती अशी की,तालुक्यातील ढालेगाव येथील चेक नाक्यावर कार्यरत आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावणाऱ्या शिक्षक बळीराम चव्हाण,अरविंद गजमल यांच्याशी हुज्जत घालून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रकार कट्टे यांच्यासह त्यांच्या सोबत असणाऱ्या पाटील,शिंदे यांनी केला हा प्रकार अत्यंत लाजीरवाणा असून पाथरीसह जिल्ह्यातील महसूल यंत्रणेला निर्णय घेण्यास महत्वपूर्ण असणारा आहे.यात कट्टे यांनी तालुक्यातील गोदाकाठच्या गावात माफियांना बळ देऊन पोसले आहे का?अशी ओरड होत आहे.हे खरेही असू शकते.कारण कोणतेही पद नसताना पाथरी तहसील परिसरात वाळूमाफिया वावरतात आणि कट्टे यांच्या कार्यालयाबाहेर हे वाळूमाफिया ठाण मांडतात हा प्रकारही लाजीरवाणा सोबतच वरिष्ठ यंत्रणेच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा आहे.तसेच केवळ आर्थिक घोडे नाचवून आपले उखळ पांढरे करणे या प्रकारावरच जास्त लक्ष घातल्या जात असल्याचे दिसून येतंय यात तलाठी सज्जाची बोंबाबोंब उडाली असून विटा(बु.)येथील तलाठी २३ तारखेपासून रजेवर आहेत येथील पदभार कोल्हे यांना देण्यात आला खरा!मात्र उद्देश कोणता?अद्याप सातबारा देण्यासाठी डीएससी.जोडण्यात आलेली नाही असाच प्रकार तालुक्यात प्रत्येक सज्जात होत आहे.यासोबतच तालुक्यातील राशन दुकानदारांवर नियंत्रण नसल्याने मोफत धान्य तर देण्यात आलेले नाहीच शिवाय विकतचे धान्य वाटपमध्ये दक्षता समितीचे नियंत्रण या दक्षता समितीवर तहसीलदार यांचे नियंत्रण नसल्याने या विभागासोबतच निराधार विभागाचा कारभार अनागोंदी असल्याचे दिसून येत आहे.या सर्व प्रकाराला जबाबदार सुभाष कट्टेच असल्याची ओरड तलाठ्यांच्या माध्यमातून होत आहे.तरीही साहेब!तुम्ही भांडता इतरांनी काय आदर्श घ्यावा!अशी चर्चाच आता गोदकाठी पोसलेल्या माफियातून होत आहे.या घटनेने तरी जिल्हा प्रशासनातील दक्ष अधिकारी म्हणून नामोल्लेख असणाऱ्या जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी दखल घ्यावी अशी मागणीही होत आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group