प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली हिंगोली जिल्हयाला लाभलेले जिल्हा पोलिस अधिक्षक IPS राकेश कलासागर यांना जिल्हायाचा पदभार घेऊन अवघे सात महिने...
प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्हयाला लाभलेले जिल्हा पोलिस अधिक्षक IPS राकेश कलासागर यांना जिल्हायाचा पदभार घेऊन अवघे सात महिने झाले आहेत. शांत संयमी असलेले कलासागर यांनी अवघ्या सातच महिन्यात जिल्ह्यातील गुन्हेगारांचा छडा लावण्यात गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरत आहेत. कलासागर यांनी चोरी, दरोडा, मोटारसायकल चोरी, मोबाईल चोरी, आदी सोबत अवैध धंदेचाकांना सळो की पळो करून सोडले आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी जिल्हयाचा पदभार घेतल्यानंतर पोलिस अधिक्षकांची महत्त्वाची समजली जाणारी स्थानिक गुन्हे शाखे मध्ये उदय खंडेराय नावाच्या यंग व कर्तबगार पोलिस अधिकारी यांची नियुक्ती केली. पोलिस निरिक्षक उदय
खंडेराय यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी उत्कृष्ट पणे पार पाडत पोलिस अधिक्षक यांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता आपले कर्तव्य बजावत आहेत. व स्थानिक गुन्हा शाखेच्या माध्यमातून अवैध धंदे असो की विविध गुन्हयाचा तपास उत्कृष्ट रित्या पार पाडत आहेत. त्यांना स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक किशोर पोटे यांची महत्त्वाची साथ लाभत आहे. मागील तिन महिन्यात जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात घडलेल्या खुन, महिला अत्याचार, चोरी, दरोडा, मोटारसायकल चोरी, मोबाईल चोरी प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या काही तासात लावण्यात यश आले आहे. त्याच बरोबर अवैध गुटखा, मटका, दारू,जुगार अड्डे, अवैध वाळू वाहतुकिवर कारवाया चा सपाटा सुरूच आहे. ज्यामधे अनेक आरोपींना अटक करून करोडो रूपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील हिंगोली शहर, हिंगोली ग्रामीण,औंढा, हट्टा, कुरूंदा, वसमत ग्रामीण, बासंबा, कळमनुरी, आखाडा बाळापुर, नर्सी आदी पोलिस ठाण्यात कर्तबगार अधिकारी यांची नियुक्ती केल्याने सदर ठाणेदार हे पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. एकंदरीत पोलिस अधिक्षक राकेश कलासागर अल्पावधीतच गुन्हेगार व अवैध धंदेचालकांचे कर्दनकाळ ठरीत आहेत. मंगळवारी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ट्रकचालकाचे मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफास करीत 38 अँड्रॉइड मोबाईल सह 3 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ज्याची माहिती प्रेस कान्फरंस मध्ये देत असताना पोलिस अधिक्षक कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे.


COMMENTS