धर्माबाद (अहमद लड्डा) कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहून नगरपालिका प्रशासनाने आता तातडीची पावले उचलली आहे.
धर्माबाद नगर पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांच्या आदेशान्वये धर्माबाद नगरपालिकेचे कोरोना नियंत्रक अधिकारी तथा प्रभारी स्वच्छता विभाग प्रमुख रुखमाजी भोगावार यांच्या खड्या पहाऱ्यातून
ट्रॅक्टर वरून न. पा .चे कर्मचारी लक्ष्मण चुरमुरे ,अविनाश सोनटक्के, कांबळे हे ट्रॅक्टर वरून न. पा .चे कर्मचारी संपूर्ण ठिकाणी आज पासून सोडियम हायड्रोक्लोराईड हे निर्जंतुकीकरणास वापरण्यात येत असून,
धर्माबाद शहरात व रत्नाळी, बाळापूर सर्व प्रमुख रस्त्यावर तसेचआज दिवसभरात गुजराथी कॉलनी, रामनगर, देवी गल्ली,कुंठा गल्ली निर्जतुकीकरण
फवारणीची मोहीम सुरू असुन सायंकाळपर्यंत ९० ते १०० टक्के फवारणी पूर्ण होणारअसल्याची माहिती रुखमाजी भोगावर यांनी दिली. ह्यासाठी ह्या सर्व कर्मचार्याचें सर्वस्व कौतुक होत आहे.

COMMENTS