प्रतिनिधी - महेंद्र पुरी, हिंगोली
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ व माहेश्वरी समाजाचे जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांनी त्यांचे कुटुंबियाच्या लग्नसोहळ्यात शासनाने घालवून दिलेले निर्बंध पाळून लग्न सोहळ्यात रक्तदान शिबीराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी पण जपली.
कळमनुरी येथील तोष्णीवाल यांच्या कुटुंबातील आकाश गोकुळदास व लातूर येथील ओमप्रकाश चांडक यांची कन्या धनश्री यांचा शुभविवाह कळमनुरी येथे शासकीय निर्बंधाचे पालन करून संपन्न झाला. यावेळी विवाहाचे औचित्य साधून व कोरोना काळात प्रखरतेने जाणवणारी रक्ताची टंचाई पाहता कुटूंबातील लग्नसोहळ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. शिबिरात वधू-वराची आई, भाऊ , बहिणीसह नातेवाईकांनी रक्तदान करून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपली. नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असलेले पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांनी कोरोना काळात लग्न समारंभात रक्तदान शिबीराचे आयोजन करून नवा आदर्श निर्माण केला आहे.हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी व रक्त विघटन केंद्र यांचे वतीने रक्त संकलन केले रक्तपेढीतील बंडू नरवाडे, संदीप धुळे नितेश हांडगे, अरविंद यांनी या शिबिरात १४ पिशव्या रक्त जमा केले जेंव्हा की लग्ना करता फक्त 25 लोकांना सहभागी होण्याची परवानगी मिळालेली होती .रक्तदान शिबीरासाठी
नंदकिशोर तोष्णीवाल, गोकुळदास तोष्णीवाल, जुगल तोष्णीवाल, कैलाश भंडारी, राजेश बाळदी, गणेश मालपाणी, गोविंद सारडा, बालाप्रशाद तापडीया लातुर थेथील ओमप्रकाश चांडक, संतोष मुंदडा, आशोक राठी, नरसींग चांडक, चेतन जाजू, डॉ. अंकित सारडा, रितेश चांडक आदींनी सहकार्य केले. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS