प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
सध्या सर्वत्र कोविड महामारीने थैमान घातले असुन कोरोना बाधीत रूग्णांना आँक्सीजन सिलेंडर ची आवश्यकता भासत आहे. हिंगोली शहराला आँक्सीजन पुरवठा करणाऱ्या पुरवठा धारकाने निर्धारित वेळेत आँक्सीजन घेऊन हिंगोलीत न पोहचल्याने संशयावरून महसुल विभागाने पोलिस प्रशासनाच्या मदतीने सदर आँक्सीजन पुरवठा धारकास गाडीसह ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणुन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या उपस्थितीत रविवारी नियमानुसार संबंधीत रूग्णालयात आँक्सीजन पुरवठा करण्यात आला.
या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील आँक्सीजन पुरवठा धारक मुजाहिद याने महसुल प्रशासनाचे पत्र घेऊन नांदेड येथुन 50 व जालना येथुन 113 सिलेंडर घेऊन वाहनाने हिंगोली कडे निघाला मात्र निर्धारित वेळेत हिंगोली शहरात पोहचला नसल्याने आँक्सीजन पुरवठा धारकाच्या वर्तणूकीबद्दल प्रशासनाला शंका आल्याने महसुल चे अधिकारी यांनी पुरवठा धारक व गाडीचालकाला संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याने शंका बळावल्याने हिंगोली चे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व तहसिलदार माचेवाड यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस निरिक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्फत आँक्सीजन पुरवठादार यांच्या मोबाईल चे लोकेशन काढुन पोलिस पथकाला पाठून आँक्सीजन ची एक गाडी मंठा येथुन तर दुसरी गाडी कळमनुरी परिसरातुन पोलिसांनी शोध घेऊन शहर पोलिस स्टेशनमध्ये आणल्या. त्यानंतर रविवारी सकाळी हिंगोली चे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व तहसिलदार पांडूरंग माचेवाड, पोलिस निरिक्षक पंडीत कच्छवे यांच्या उपस्थितीत शहर पोलिस ठाण्यातुन नियमानुसार संबंधीत रूग्णालयास आँक्सीजन पुरवठा करण्यात आला. महसुल प्रशासन व पोलिसांच्या सतर्कतेमुळे आँक्सीजन सिलेंडर काळ्याबाजारात विक्री होण्यापुर्वीच कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सदर आँक्सीजन पुरवठा धारकाची शहर पोलिसांकडुन कसुन चौकशी सुरू असुन चालक कधी गाडी खराब झाली तर कधी डिझेल संपल्याचे सांगत आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पुढिल तपास जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर चे पोलिस निरिक्षक पंडीत कच्छवे हे करीत आहेत.

COMMENTS