प्रबळ इच्छाशक्तीच्याआधारे ८६ वर्षाच्या योध्दयाने केली 'कोरोना'वर यशस्वी मात

         नांदेड. (विशेष प्रतिनिधी) नांदेडच्या सिडको-हडको परिसरातील जेष्ठ नागरिक व ८६ वर्षीय सेवानिवृत्त ग्रामसेवक गणपतराव वडजे टेंभुर्णीकर य...


        

नांदेड. (विशेष प्रतिनिधी) नांदेडच्या सिडको-हडको परिसरातील जेष्ठ नागरिक व ८६ वर्षीय सेवानिवृत्त ग्रामसेवक गणपतराव वडजे टेंभुर्णीकर यांनी आपल्या अतिशय प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर नुकतीच 'कोरोना'वर अगदी यशस्वीपणे मात केली आहे.

नांदेडच्या 'हडको' परिसरातील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते श्याम वडजे पाटील टेंभुर्णीकर यांचे वडील सेवानिवृत्त ग्रामसेवक गणपतराव वडजे यांना काही दिवसांपूर्वी 'कोरोना'ची लागण झाली. नायगाव तालुक्यातील टेंभुर्णी तसेच पंचक्रोशीत नावाजलेले व्यक्तीमत्व व अतिशय कडक शिस्तीच्या स्वभावाचा ग्रामसेवक म्हणून सुपरिचित असलेले गणपतराव वडजे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली असल्याची बाब समजली. मात्र, तारूण्यापासून

कुठल्याही परिस्थितीला अगदी खंबीरपणे सामोरे जाण्याची तयारी      

ठेवणारे गणपतराव वडजे हे महाभयंकर 'कोरोना'ची लागण झाली असल्याची माहिती समजल्यानंतरही घाबरणे तर दूरच सोडा, पण किंचितही डगमगले नाहीत. 

विशेष बाब म्हणजे, गणपतराव वडजे यांना गेल्या काही वर्षांपासून अस्थमा, मधुमेह व रक्तदाबाचा आजार असताना त्यांना मध्येच 'कोरोना'नेही गाठले. घरात पहिलेच एक कोरोना पॉझिटिव्ह पेशंट असल्याने मुलगा श्याम त्याच्या आईच्या सेवेत एका कोव्हीड सेंटरमध्ये होता. तेवढ्यात वडीलांना रक्ताच्या उलट्या झाल्या म्हणून समजल्यामुळे त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी, त्यांची कोव्हीड चाचणी केली असता, ते 'कोरोना' पॉजिटीव्ह असल्याचे आढळले. तद्नंतर त्यांनासुद्धा उपचाराकरिता सुप्रसिद्ध 'कोव्हीड' केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. त्याचवेळी, तेथील डॉक्टरांच्या तब्बल नऊ दिवसाच्या अथक परिश्रमाने आणि गणपतराव वडजे यांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांना महाभयंकर समजल्या जाणाऱ्या 'कोरोना'वर अगदी यशस्वीपणे मात करणे सहजपणे शक्य झाले आहे.

एकूणच, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि डॉक्टरांच्या अथक परिश्रम तसेच औषधोपचाराने कोरोनासारख्या भयानक साथरोगावर आपल्याला यशस्वीपणे मात करता येते, ही बाब गणपतराव वडजे यांनी सद्यस्थितीत औषधोपचार घेणाऱ्या 'कोविड'च्या सर्व रूग्णांना सिध्द करून दाखविले आहे, हे विशेष. उपरोल्लेखित बातमी वाचून कोरोना या महाभयंकर साथरोगाने भयभीत झालेल्या हजारो रूग्ण तथा नागरिकांना दिलासा मिळेल, अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली तर वावगे ठरणार नाही.

दरम्यान, वडील गणपतराव वडजे यांच्यासोबतच ७८ वर्षीय आई भागिरथीबाई वडजे यादेखील कोरोनावर यशस्वीपणे मात करून नुकत्याच अगदी सुखरूप आपल्या घरी परत आल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते श्याम वडजे यांच्या चेहऱ्यावर अगदी मनस्वी आनंद ओसंडून वाहत असल्याचे स्पष्ट चित्र त्यांच्या सर्व नातेवाईकांसह मित्रमंडळी व नांदेडच्या सिडको व हडको परिसरातील बहुसंख्य सामान्य नागरिकांना पहावयास मिळाले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group