केज! रमेश इतापे
सध्या कोरोनाने संपुर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे रुग्णांचा आकडा कमी होण्यास तयार नाही ,
सध्या कोरोनाने देशात हाहाकार माजला आसला तरी याला जबाबदार कोण?
बीड जिल्ह्यात हजाराच्यावर रोज रुग्णांना चा आकडा निघत आसला तर या आकड्याला जबाबदार कोण? जनता की प्रशासन, प्रशासन युध्द पातळीवर कोरोना रोखण्यासाठी पराकाष्टा करत आहे, पण या कडे जनता गांभीर्याने घेत नाही सध्या जनता कर्फ्यू लागु करण्यात आले असले तरी नागरीक बुळबुळ करत घरा बाहेर फिरताना दिसत आहे, मंग प्रशासनाने कितीही लाँकडाऊन, जनता कर्फ्यू लागु केले तरी या मोकार फिरणाऱ्या टुकारांना कोण आवरणार, प्रशासन प्रत्येक माणसा जवळ जावुन रोखु शकत नाही, जनतेनेच जनाची नाही तर मनाची तरी राखुन कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले तरच कोरोना हद्दपार होईल अन्यथा कोरोना दिवसेंदिवस वाढतच राहील, कारण लोकांना फक्त घरा बाहेर पडण्यासाठी कारण पाहीजे, कोणी किराणा, भाजी पाला, दुध, बेकरी, पेट्रोल कांही तर कारण पुढे करुन घरा बाहेर पडताना दिसत आहेत,मंग तुम्हाला तुमच्या जिवाची पर्वा करता येत नसेल तर प्रशासन तरी कुठवर पुरेल.
विचार करा तुमच्या जिवाची पर्वा तुम्हाला नसेल तर, प्रशासनाने कितीही लाँकडाउन, कितीही जनता कर्फ्यू लागु केले तरी याचा काहीही उपयोग होणार नाही, जो पर्यंत जनता सहकार्य करणार नाही तो पर्यंत कोरोना हद्दपार होणार नाही आसेच चित्र सध्या तरी केज तालुक्यात व परीसरात सर्वत्र पहावयास मिळत आहे ,प्रशासन म्हणजे कोण ?आपणच -------!मग आपल्या साठि केले ले नियम आपणच मोडतो याला जबाबदार हि आपणच आहोत , म्हणून जनतेने जनतेसाठि जनतेसारखे वागावे असे जनतेलाच वाटू लागले आहे आन्यथा कोरोना आपले काम करतच आहे यात आश्चर्य वाटायला नको .

COMMENTS