माजलगाव/प्रतिनिधी
2020 मध्ये कोरोना विषाणू ने शिरकाव करू नये म्हणून भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जनता कर्फ्यु जवळपास तीन महिने लागू केले होती सरकारच्या आदेशाने भारतात एकही गरीब अन्नधान्या पासून वंचित राहिला नाही ज्या गरीब कुटुंबाला अन्नधान्याची गरज लागत असेल त्याला महसूल प्रशासनाने व अन्नदात्यांनी तीन महिने अन्न पुरेल इतका अन्नधान्य पुरवठा केला होता. आताच्या लॉक डाऊन मुळे भटक्या गोसावी लोकांचे अन्ना वाचून हाल होत आहेत तरी ही महसूल प्रशासन यांच्या कडे कान्हा डोळा करतांना दिसत आहे.
माजलगाव तालुक्यात सर्व खेड्यातील कोरोना विषाणू ने शिरकाव केल्यामुळे गावातील प्रत्येक गावात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत म्हणून गावकऱ्यांनी दुसऱ्या व्यक्तीला गाव बंदी केल्यामुळे भिक्षा माघून खाणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत "बाप जगू देईना अन माय भीक मागू देईना" अशी गत गोसावी समाजातील भिक्षा माघून खाणाऱ्या लोकांची अवस्था झाली आहे. वय वृद्ध व लहान मुलांचा प्रशासनाने विचार करावा. कोणी पालावर गेले की, त्यांना असे वाटते कोणी तरी काही तरी घेऊन आले आहे.आज ची परिस्थिती खूप बिकट झाली आहे माजलगाव च्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी पाला वर राहणाऱ्या गोसावी समाजाची रोशन ची व्यवस्था करावी असे जन सामान्यांतुन बोलले जात आहे
--------------------------------------
हे लोक फिरस्ते आहेत त्यामुळे येथे असणाऱ्या कुटुंबातील लोकांची माहिती घेऊन या लोकांना पुरवठा विभागा मार्फत रेशन देण्या बाबत मार्गदर्शन घेऊन तात्काळ रेशन ची व्यवस्था केली जाईल
वैशाली पाटील
तहसीलदार माजलगाव

COMMENTS