नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यातील ८९ गावातील शासना मार्फत आलेल्या घराकुलासाठी रेतीची टंचाई व महागाई वाढल्यामुळे घरकुल धारकाची पाचावर धारण उठली होती परंतु नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिलेल्या पत्राची दखल घेऊन त्वरित रेती संदर्भात बैठक बोलावण्यात आली होती त्या बैठकीत रेतीचा प्रश्न मांडून प्रश्न सोडून देण्यात आला व नायगांवचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी मान्य करून प्रति दोन ब्रास पहिल्या टप्प्यात वाटप करण्याचे आश्वास दिले आहे.
तालुक्यातील घरकुल लाभधारकांना कळकळीचे आवाहन कारण्यात येते की सर्व लाभ धारकांनी अर्ज दाखल करून रेती घेऊन जावे घराचे बांधकाम चालू करण्यात यावे पावसाळा जवळ येत असल्यामुळे बांधकाम करण्यास विलंब होत असून रेतीचे वाटप सुरू झाले आहे लवकर अर्ज करून रेती घेऊन जाणे असे कळविण्यात येते नायगांव तहसीलदार गजानन शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये दोन ब्रास रेती व दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन ब्रास रेती देण्याचे मान्य केले आहे तरी सर्व घरकुल लाभधारकांनी रेती घेऊन जाऊन कामाला लवकर सुरुवात करणे आणि शासनाला सहकार्य करणे व तसेच तहसीलदार गजानन शिंदे यांचे लाभधारकांनी अभिनंदन केले ही प्रलंबित विषय हा मार्गी काढून आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या हेतूने साहेबांनी खूप चांगला प्रयत्न करून लाभधारकांना न्याय देण्याचे काम मराठा महासंघाच्या पाठपुराव्याने घरकुल धारकांना रेतीचे दोन टप्प्यात वाटप कारण्यात येत आहे.

COMMENTS