नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव ताल्युक्यातील गडगा येथील रहीवासी तथा नाथोबा मा व ऊच माध्यमीक विदयालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शेख एच डी नंदुरकर यांची कन्या शेख नजमा हीने नांदेड येथील डाॅ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविदयालय येथुन एम बी बी एस ची अंतिम वर्षाच्या परिक्षेत ६७ टक्के गुण घेऊन ऊज्वल यश संपादन केले आहे.नजमा शेख ही विद्यार्थीनी पहील्या वर्गापासुनच शांत स्वभावाची व अभ्यासात अत्यंत हुशार होती.तिने १० वी ला नायगांव येथील ब्लू बेल्स इंग्लीश स्कुल या शाळेतुन ९६:३६ टक्के व १२ वी ला नांदेड येथील यशवंत महाविदयालयातुन ९३ टक्के गुण मिळविले.२०१६ मध्ये C E T परिक्षेत २००पैकी १८४ गुण घेऊन एम बी बी एस ला प्रवेश मिळविला.दि.२६ एप्रिल रोजी अंतिम वर्षाचा निकाल लागला त्यामुळे तिला एम बी बी एस ची पदवी प्राप्त झाली आहे.तिने यशाचे श्रेय आई,वडिल,गुरूवर्य,भाऊ यांना दिले आहे.गडगा गावातुन एम बी बी एस डाॅक्टर होण्याचा पहिला मान मिळविला व गावातील विदयार्थासमोर आदर्श ठेवला आहे.या पुढे एम.डी.डि.जी.ओ.होऊन ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करण्याचा मानस आमच्या प्रतिनिधी समोर व्यक्त केला आहे.या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

COMMENTS