* नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) नायगांव तालुक्यातील गडगा कहाळा रस्त्यावर मांजरम शिवारात वळण रस्त्यावर दोन मोटार सायकलीच्या सम...
*
नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यातील
गडगा कहाळा रस्त्यावर मांजरम शिवारात वळण रस्त्यावर दोन मोटार सायकलीच्या समोरासमोरील धडकेत एक शिक्षक जागीच ठार झाले तर दुस-या मोटार सायकालवरील एक पुरुष व महिला दोन्ही गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे.
दि 29 एप्रिल 2021 रोज गुरूवारी सकाळी दहाच्या दरम्यान मांजरम येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक शेषेराव भुजंगराव पवार ( वय ५४ ) हे मोटार सायकालवर शाळेच्या कामा निमित्त नांदेड येथून मांजरमला येत होते. तर मुखेड तालुक्यातील मंडलापुर येथील एक महिला व एक पुरुष सासु व जावाई हे कामा निमित्त नांदेडला जात असतांना समोरासमोर जोराची धडक झाली.यात शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातातील गंभीर दोन्ही जखमींना तत्काळ पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले सदरील शिक्षक विद्यार्थी प्रिय होते शिक्षक व साहित्यिक असलेल्या गुरूजी यांच्या अपघाती निधनाची वार्ता समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
*कहाळा गडगा रोडवर मांजरम शिवारात मोटरसायकलची मोटारसायकल समोरासमोर धडक झाली त्यात एक शिक्षक जि प हा मांजरम शेषेराव भूजगराव पवार वय 54 हे जागीच ठार,तर दुसऱ्या मोटार सायकल वरील एक जण गँभिर तर एक जखमी. सदर अपघात आश्रम शाळेच्या वरच्या बाजूने रेड्डीच्या खोरी कडे जाणाऱ्या कॉर्नर वर शाहजी जयराज पो.पा. शिंदे यांच्या शेता जवळ झाला आहे.जखमी बोरगाव मंडलापूर ता.मुखेड येथील आहेत अशी माहिती आहे.जखमींना नांदेड येथे उपचारासाठी नेले आहे*.


COMMENTS