नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यासह ग्रामीण भागातील जनतेची अडचण लक्षात घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणिस वसंत पाटील सुगावे यांनी लोकांची होणारी गैरसोय कुठे तरी थांबली पाहिजे म्हणून या डोळस विचाराने आणि जनसामान्याच्या कल्यानासाठी घुंगराळा येथे प्रार्थमिक आरोग्य केंद्राला मंजुरी देण्यात यावी म्हणून मागणी केली होती त्या मागणीची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली असल्यामुळे लवकरच प्रार्थमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळणार असल्याची माहिती व
संत पाटील सुगावे यांनी दिली आहे .
तालुक्यातील घुंगराळा हे गाव नांदेड ते हैद्राबाद राज्यमहामार्गावर असून ते तीन राज्याला जोडले आहे आंध्रप्रदेश, कर्नाटक, व तामिळनाडू या राज्याच्या मार्गावर असल्यामुळे या गावात अनेक सुविधा राहावेत म्हणून माजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे ही घुंगराळा येथे शेतकऱ्यांना व बँकेच्या खातेदाना जवळचा पर्याय म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेची मान्यता द्यावी म्हणून मागणी केली होती परंतु कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन असल्याने बँकेची मागणी वेटिंगवर आहे
घुंगराळा गावाच्या विकासात भर पडावी आणि मोठ मोठया सुविधा गावात राबल्या पाहिजेत या हेतूने पशुसंर्वधन तथा दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या कडे ही गावात पशुवैद्यकीय दवाखाण्याला मान्यता मिळावी म्हणून मागणी केली होती परंतु गेल्या वर्षा पासून राज्यातील कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व मागण्या प्रलंबित असल्या तरी प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच मान्यता मिळणार असल्याचे वसंत पाटील सुगावे यांनी सांगितले आहे .
----- अन' घुंगराळा येथे ए टी एमची सुविधा -----
वसंत पाटील सुगावे यांच्या आग्रह नुसार दिनेश दिंगाबरराव पाटील मोरे यांनी घुंगराळा येथे ए टी एमची सुविधा केली असून या पूर्वी सदरची सुविधा नव्हती ती कार्यान्वित करण्यासाठी वसंत पाटील सुगावे यांनी जागा उपलब्ध करून दिली असल्यामुळे ग्रामीण भागातील जनसमान्य माणसाची गैरसोय टळली असल्यामुळे जनतेतुन समाधान व्यक्त करण्यात येत असून ए टी एमची सुविधा ही नरसी येथे जात असल्याची माहिती सुगावे यांना कळाली सदरची सुविधा घुंगराळा येथे मागून घेतली असल्याने वेगवेगळ्या बँकेची रक्कम नागरिकाला काढता येत आहे.

COMMENTS