हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांनी लाकडाऊन लावले असुन तरी सुध्दा जिल्ह्यात चोरी छुपे अवैध धंदे सुरूच आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सी चे ठाणेदार सुनिल गिरी यांनी अवैध धंद्या विरूद्ध कारवाई ची मोहिम राबवीत अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या ट्रक्टर सह मटका जुगारावर कारवाई करीत 6 लाखाचा मुद्देमाल जप्त करून 7 आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या बाबत अधिक माहिती अशी कि नर्सी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल गिरी यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून रात्री 9 वाजेच्या सुमारास नर्सी नामदेव परिसरातील गोमती नदीच्या पुलावर क्रमांक नसलेले ट्रँक्टर अवैध वाळू वाहतुक करतांना आढळून आले यावेळी नर्सीच्या पथकाने कारवाई करून 5 लाख 70 हजार रूपये किमतीचे ट्रँक्टर व एक ट्राली वाळू जिची किमंत 5 हजार असा एकूण 5 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी नर्सी पोलिस ठाण्यात आरोपी चालक प्रकाश विक्रम पातळे व अन्य चार असे पाच आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरी कारवाई जांभरून रोडगे परिसरात सुरू असलेल्या मटका जुगारावर करून दोन आरोपी विरूद्ध गून्हा दाखल करीत त्यांच्या कडून मटका जुगाराचे साहित्य नगदी रूपये व एक मोटरसायकल असा एकूण 27 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. असा एकुण 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ठाणेदार सुनिल गिरी यांच्या कारवाई ने चोरी छुपे अवैध धंदे करणारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
*ठाण्याच्या हद्दीतील गावात अवैध धंदे खपवून घेणार नाही- गिरी*
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात अवघ्या काही महिन्यांपूर्वी रूजु झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गिरी यांनी नर्सी ठाण्याचा कायापालट करीत ठाणे परिसर स्वच्छ केला आहे. ठाण्याच्या परिसरात झाडे लावली, वाँकिंग ट्रेक, क्रिकेट चे मैदान, व्हालीबाँल चे मैदान निर्माण केले आहे. ज्या प्रमाणे ठाण्याचा परिसर स्वच्छ केला. त्याच प्रमाणे ठाण्याच्या हद्दीत चोरीछुपे चालणाऱ्या अवैध धंद्याची गुप्त माहीती काढून कारवाई ची मोहीम सुरू केली आहे. ठाण्याच्या हद्दीत कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेणार नाही असा ईशारा त्यांनी दिला आहे.

COMMENTS