*०७ गुन्हे दाखल,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांची कार्यवाही कारवाई.*
सोनपेठ/प्रतिनिधी सिद्धेश्वर गिरी
मागील अनेक दिवसापासून लातूर जिल्ह्याच्या हद्दीतील आणि परळीस लागून असलेल्या वसंतनगर तांडा येथे अवैधरित्या हातभट्टीची निर्मिती करुन लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे काम केल्या जात होते.याबाबत गोपनीय तक्रारी दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी धाडसी कार्यवाही करुन लातूर पोलिसांचे नाव कमावल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.याबाबत थोडक्यात माहीती अशी की,लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिलेले होते.याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी विद्यानंद काळे,यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे,पोलीस ठाणे रेणापुरचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या नेतृत्वाखाली वसंतनगरतांडा तालुका रेणापुर येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणारे ०७ इसमावर स्थानिक गुन्हे शाखा,लातूर व पोलिस ठाणे रेणापुर यांचे पथकाने आज दिनांक रविवार २५ एप्रिल रोजी रोजी सकाळी छापामारी करुन कार्यवाही केली.यामध्ये ८१,००० लिटर रसायन व साहित्य असा एकूण किंमत ३ लाख ८७ हजार रुपयाचे रसायन आणि हातभट्टी निर्मितीचे साहित्य नष्ट करण्यात आले.या कार्यवाहीत
सुखदेव खंडू राठोड वसंतनगर तांडा,रमेश भाऊसाहेब चव्हाण वसंतनगर तांडा,बालाजी भानुदास चव्हाण वसंतनगर तांडा,विनायक भानुदास चव्हाण वसंतनगर तांडा,फुलाबाई गणू चव्हाण वसंतनगर तांडा,बालाजी सुखदेव राठोड वसंतनगर तांडा,बाबाराव माणिक पवार वसंतनगर तांडा,तालुका रेणापुर जिल्हा-लातूर अशा एकूण ०७ आरोपीवर पो.ठाणे रेणापुर येथे एकूण ०७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.वरील कामगिरीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार संजय भोसले,पोलीस अंमलदार अंगद कोतवाड,राजेंद्र टेकाळे,प्रकाश भोसले,रामहरी भोसले,युसुफ शेख,राहुल सोनकांबळे,प्रमोद तरडे,रामदास नाडे,नितीन कटारे,सुधीर कोळसुरे,सिद्धेश्वर जाधव,हरून लोहार,यशपाल कांबळे,नागनाथ जांभळे,प्रदीप चोपण तसेच रेनापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार गुळभिले पोलीस नाईक ठाकरे महिला पोलीस अंमलदार पवार यांनी ही कार्यवाही केली आहे.या धाडसी कार्यवाहीबद्दल परिसरातील लोकांमधून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

COMMENTS