सोनपेठ/प्रतिनिधी
तालुक्यातील वडगांव (स्टे.) येथील जि.प.कें.प्रा.शाळेत कोवीड-१९ च्या लसीकरणाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.४५ वर्षापुढील व्यक्तीना यावेळी सदर लस देण्यात आली.जगाला विळखा घातलेल्या कोविड-१९ मौजे वडगांव स्टे.येथे सोनपेठ तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी.पवार यांच्या मार्गदशनाखाली शुक्रवार रोजी कोविडच्या लसीकरणास सुरूवात झाली होती.वडगांव स्टे.येथील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पं.स.सोनपेठ माजी सभापती शंकर बचाटे यांनी केले.यावेळी ज्ञानोबा बचाटे,वैजनाथ शिनगारे,अरुण डाके,अमोल बचाटे,प्रल्हाद बचाटे,डिंगाबर शिनगारे,दिपक बचाटे,राम जोशी,आरोग्य अधिकारी डॉ.संध्या गिरी,आरोग्यसेविका अनुजा खांडेकर,पद्मजा सोळंके,पि.एच.कठाळे,एम.पी.डब्ल्यू,व्ही.डी.राठोड,आर.एन.राठोड,गणुदास राठोड,हानुमान बांगे सर,वैजेनाथ इंगोले,पारस सुरजे,उखळी बु.आरोग्य उपकेंद्राअंतर्गत सर्व आशावर्कर सरस्वती सावंत,निशा कदम,संगीता साळवे,ग्रामपंचायत कर्मचारी माऊली बचाटे,सुभाष खुरपे,तसेच ४५ वर्षावरील नागरीक उपस्थित होते.

COMMENTS