शिवप्रसाद कदम तळणी ता . हदगाव येथील तरुण शेतकरी जनावरांचे चारा - पाणी करायला गोठ्या कडे गेला असता अचानक त्याच्या वर विज पडल्याने त्यातच त्य...
शिवप्रसाद कदम
या बाबत अधिक माहीती अशी की तळणी ता . हदगाव येथील नितिन पांडूरंग दळवी ( वय 34 ) हा शेतकरी गावाला लागून असलेल्या जनावरांच्या गोठ्यात जनावरांचे चारा - पाणी करायला गेला होता . अचानक वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाच्या सरी बरसल्या . पाऊस येत असल्याने तो झपाट्याने गोठ्या कडे निघाला परंतू नियतीने डाव साधला . एकदम गोठ्या जवळ गेल्या बरोबर त्याच्या अंगावर विज कोसळली अन् त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला . शवविच्छेदना करीता त्याचा मृत्यू देह हदगाव च्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला . त्याच्या पश्चात आई , वडील . पत्नी , दोन लहान मुली आहेत .

COMMENTS