स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा तेविसावा दीक्षान्त समारंभ ४ मे रोजी सकाळी ११:०० वा. पार पडणार आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) पार पडणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती श्री. भगतसिंह कोश्यारी हे भूषविणार आहेत.
या समारंभास मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना. श्री. उदयजी सामंत हे असणार आहेत. आदरणीय अतिथी म्हणून मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च चे संचालक प्रा. एस. रामकृष्णन हे असणार आहेत. प्रा. रामकृष्णन स्नातकांना उद्देशून दीक्षान्त भाषण करणार आहेत. या तेविसाव्या दीक्षान्त समारंभासाठी राज्यशिष्टाचार प्रमाणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. वसंत भोसले यांच्यासह मा. व्यवस्थापन परिषद, मा. विद्यापरिषदेचे सदस्य दूरदृश्य प्रणालीद्वारे या तेविसाव्या दीक्षान्त समारंभास उपस्थित राहणार आहेत. या समारंभाचे थेट प्रेक्षेपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर *(www.srtmun.ac.in) ‘Live-23rd Convocation Ceremony’* या लिंक द्वारे होणार आहे.
तरी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालकांनी विद्यापीठाचा तेविसावा दीक्षान्त समारंभ विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वर दिलेल्या लिंक द्वारे घरी बसून पाहावा. असे अवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. वसंत भोसले यांनी केले आहे.

COMMENTS