माजलगाव प्रतिनिधी
माजलगाव येथील व्यापाऱ्यांनी या काळात आपले प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी यांनी केले आहे.
आज पर्यंत लाॅकडाऊन काळात अनेक व्यापाऱ्यांनी पाठीमागून समोरून दुकाने उघडून व्यवसाय केला त्यामुळे पोलिस प्रशासनाला कारवाई करावी लागली, लाॅकडाऊन आपल्या सुरक्षेसाठी आहे हे लक्षात घेऊन आपले व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवून घरी बसून आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.
जे कुणी व्यापारी लॉकडाऊन काळात प्रशासनाच्या नियमा विरोधात जाऊन दुकाने उघडून व्यवसाय करतील त्यांनी पुढील होणाऱ्या परिणामाची जबाबदारी घ्यावी नंतर संघटनेला दोष देऊ नये कृपया शक्यतो व्यापाऱ्यांनी या बंदला प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी उपाध्यक्ष सचिव भांडेकर यांनी केले आहे.
दरम्यान अशा उघडझाक व्यवसायामुळे प्रशासनासह व्यापाऱ्यांची बदनामी होत असून या महामारीच्या काळात आपण सुरक्षित राहून दुसऱ्यांना सुरक्षित ठेवावे.

COMMENTS