【 पोलीस पाटीलच मुख्य आरोपी 】
नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यातील कुंटुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेळगाव येथील ग्रामपंचायत निवडणून आलेल्या व पडलेल्या पार्टीमध्ये या दोन गटात वाद होऊन एकमेकाला काठीने बेदम मारहाण केल्याने एकूण एकवीस जनावर परस्पर गुन्हे सिंघम सपोनी करीम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये मुख्य आरोपी हा मेळगाव येथील पोलीस पाटील आहे. पोलीस पाटील यांनी गावातील वाद गावातच संमजश्याने मिटवायचे असतात परंतु पोलीस पाटलांनी च वाद वाढविला असल्याने रक्षकच भक्षक बनल्याने कुंटूर परिसरातील एकच खळबळ माजली असून पोलिस पाटील हा शासकीय सेवेत असून जनतेचे रक्षण करण्यासाठी गावपातळीवर निवड झालेल्या पोलिस पाटलाने गावांमध्ये भांडण लावल्याची चर्चा गावातील महिला व पुरुषांतून ऐकावयास मिळत आहे.
पोलीस पाटील हांनमत शिंदे गावातील भांडण तंटे सोडवने, गावातील नागरिकांनी रक्षण करण्यासाठी शासनाने पोलीस पाटील यांची निवड केली. मात्र या घटनेत मुख्य आरोपी च पोलीस पाटील असल्याने त्यांचा एक भाऊ व दोन मुल यांनी मिळुन सदर लोकांना मारहाण केली असल्याचे गावातील नागतिकातून बोलल्या जात आले. पोलीस पाटील यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून दंगा वाढविला असल्याचे गावातील नागरिकांनी बोलून दाखविली आहे.
सदर भांडणांचे मूळ कारण म्हणजे निवडणूक ग्रामपंचायत निवडणूक 2021 मध्ये मेळगाव येथील एका पार्टीचे तीन उमेदवार व दुसऱ्या पार्टीचे तीन उमेदवार निवडून आले होते .यामध्ये उमेदवार दोन उमेदवारांना समान मते पडल्याने टाच करून निवडून आलेल्या उमेदवारांची ग्रामपंचायत ताब्यात घेतली. मात्र पडलेल्या उमेदवारांनी निवडून आलेल्या उमेदवाराच्या निवडणूक फार्ममाची चौकशी लावली त्यामध्ये अतिक्रमण ,शौच्छालय नसल्याचे मुद्दा उपस्थित झाला असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी पंचायत समिती येथून गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दोन विस्ताराधिकारी ग्रामसेवक चौकशी करत असताना फुर्यादीच्या घरा समोरील रस्त्यावर आलेल्या पायऱ्या विषयी उमेदवाराला विचारणा केली असता मी अतिक्रमण केले नाही सर हे काढले आहे. सदर गैर कायद्याची मंडळी जमवून एकमेकाविरुद्ध मारहाण झाली. त्या मारहाणीमध्ये एकूण एका गटाची 10 व दुसरया गटाची 11 एकूण 21 लोक वर गुन्हे दाखल करून संबंधितांना न्यायालयात हजर करण्यात आली आहे अशी माहिती पोलिस स्टेशनचे पीआय करीम खाँ पठाण यांनी दिली
सदर घटना दिनांक 21 4 2021 रोजी सकाळी दहा वाजता मेळगाव येथे घडली असून गुन्हा आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. गुन्हा 80 /2021, कलम 324, 323 ,143, 147 ,149 ,294 ,आयपीसी 135 मुंबई पोलीस कायदा या अंतर्गत गुन्हे दाखल केले , सदर फिर्यादी, प्रदिप माधव धसाडे, वय वर्षे 24 राहणार मेळगाव यांनी विनोद शिंदे , मोहन दत्तराव शिंदे , संतोष शिंदे ,आनंदा शिंदे ,उद्धव देवदास नरवाडे ,गणेश / बाळु मारोती शिंदे, शिवाजी रामराव नरवाडे व इतर दोन असे आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच दुसऱ्या बाजूला व यांना दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये फिर्यादी विनोद आनंदराव शिंदे यांनी गुन्हा नंबर 81 मध्ये फिर्यादी विनोद आनंदा शिंदे राहणार मेळगाव जात मराठा यांनी आरोपी 1 हनुमंत नारायण शिंदे,(पो.पा.) प्रदीप धसाडे, ज्ञानेश्वर शिंदे, दत्ता शिंदे, माधव धसाडे, उद्धव धसाडे ,वैजनाथ नारायण शिंदे , सुनील धसाडे, संदीप धसाडे ,अविनाश शिंदे, एकूण अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. असून या गुन्ह्यांमध्ये 324 323 143,147,149,504 506 कलम,135 मुंबई पोलीस कायदा अंतर्गत सिंघम सपोनी करीम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

COMMENTS