नायगांव/ प्रतिनिधी: (रामप्रसाद चन्नावार
समाज माध्यमातून दरवेळी नकारात्मकच चर्चा होत नसते तर सकारात्मक चर्चाही होवू शकते आणि या सकारात्मक चर्चेतून नायगावला चक्क कोरोना सेंटरची निर्मिती झाली. लोकसभागातून सुरु करण्यात आलेल्या 'साई माऊली' सार्वजनिक कोविड सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ बिपीन ईटनकर यांच्या हस्ते शनिवारी सकाळी पार पडले. त्यामुळे नायगावकर नुसते बोलून नाही तर करुनही दाखवतात याचा प्रत्यय यानिमित्ताने आला आहे.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, आ. आमर राजुरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे, माजी उपमहापौर आनंदराव पाटील चव्हाण अदिं मान्यवरांची उपस्थिती होती. समाज माध्यमातून चुकीचीच माहिती पसरवल्या जात असल्याचा अनेकांचा आरोप असतो पण याच समाज माध्यमातून चांगलेही काम होवू शकते हे नायगावकरांनी दाखवून दिले आहे आवाज नायगावचा या व्हाट्सएप ग्रुपवर वाढत्या कोरोनावर चिंता व्यक्त करण्यात येत असतांना सामाजिक जाणिवेतून काम करणारे डॉ. विश्वास चव्हाण यांनी आ.लंके याचा आदर्श घेण्याचा मॅसेज टाकला यावर ग्रुप अडमिन नागेश कल्याण यानी लोकसभागातून नायगावलाही सार्वजनिक कोविड सेंटर झाले पाहिजे ही संकल्पना मांडली. या संकल्पनेला सर्वानीच सकारात्मक प्रतिसाद दिला अनेकांनी सहकार्य करण्याबरोबरच मदतीची तयारी दाखवली. त्याचबरोबर सामाजिक दायित्वाच्या भावनेतून माजी आ. तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी लिटल स्टेप ही शाळा कोविड सेंटरला उपलब्ध करून तर दिलीच आणि जी काही मदत लागेल ते सुद्धा देण्याचा शब्द दिला.
दानशुरांच्या दातृत्वातून सार्वजनिक कोविड सेंटरची उभारणी झाल्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी डॉ बिपीन इटनकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याने नागरिकांनी बिनकामी न फिरता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. उद्घाटनाचे प्रास्ताविक प्रा. रवींद्र चव्हाण यांनी केले तर आभार धनराज शिरोळे यांनी मानले.
यावेळी बिलोली उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ, नायगांव उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, तहसीलदार गजानन शिंदे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर, न.प.चे.कार्यालयीन अधिक्षक संतराम जाधव.श्रीनिवास पाटील.उपनराध्यक्ष विजय पा.चव्हाण, पोलीस निरीक्षक आर.एस.पडवळ, वैद्यकीय अधिक्षक एच.आर. गुंटूरकर, डॉ. विश्वास चव्हाण, पत्रकार नागेश कल्याण, चेअरमन प्रदीप पा. कल्याण, यादव पाटील शिंदे, पांडुरंग चव्हाण, माणिक चव्हाण, साईनाथ मेडेवार, प्रताप पा. सोमठाणकर, सतीश लोकमनवार, बालाजी शिंदे, गणेश नायगावकर, सुधाकर जवादवार, कैलास रामदिनवार, साईनाथ चन्नावार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

COMMENTS