राम दातीर
माहुर (प्रतिनिधी )
संत सेवालाल महाराज यांच्या २८२ व्या जयंती निमित्त श्रीक्षेत्र माहुरगड येथे संत सेवादास मंडळ यांच्या तर्फे विविध कार्यक्रम घेऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संत सेवालाल महाराज यांच्या बंजारा तांडा माहुर येथील मंदिराच्या नियोजन जागेवर जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी जगत्गुरू संत सेवालाल महाराज यांना समाज बांधवांतर्फे भोग लावण्यात आला तद्नंतर ध्वजारोहण करून आयोजित कार्यक्रम लेंगी या पारंपरिक संचलनाने सेवालाल महाराजांची आरती करून विधिवत मुर्ती पुजा करण्यात आली.
यावेळी कोरोना काळात "मानवता हिच खरी ईश्वर सेवा" प्रमाणे जनसेवा केली या कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला त्यात आरोग्य सेेवक,नगर पंचायत कर्मचारी, पोलिस कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांचा प्रशस्तीपत्र देऊन यतोत्थित सत्कार करण्यात आला. यावेळी बालगोपाळांच्या नृत्य स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्यांचा प्रमाणपत्र व ट्राॅफी देऊन प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. संत सेवादास मंडळ, माहुर यांच्या तर्फे दरवर्षी देण्यात येणारा "बंजारा भूषण पुरस्कार-२०२१" यावर्षी माहुर नगरीच्या नगराध्यक्षा कु. शितल मेघराज जाधव यांना देऊन गौरवण्यात आले. यावेळी पं. स. सभापती सौ. निलाबाई राठोड, उप-सभापती डॉ. उमेश जाधव, माजी पं.स.सदस्य किशन राठोड, माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, माजी उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मेघराज जाधव,भाजपा तालुका अध्यक्ष दिनेश येऊतकर, ज्येष्ठ पत्रकार पत्रकार विजय आमले, नगरसेविका सौ. वनिताताई जोगदंड, भाजप महिला आघाडी शहराध्यक्षा अर्चना दराडे, पद्माताई गिर्हे, डी. डी. चव्हाण हे उपस्थित होते. यावेळी सुञसंचालन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष सुमितभाऊ राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद राठोड यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष आकाश जाधव, नायक पांडुरंग राठोड, कारभारी विष्णू जाधव, गणेश जाधव, जुगल चव्हाण व समस्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

COMMENTS