◼️पोलीस अधीक्षक राजा राम स्वामी यांच्या पथकाने केला वाळू उपसा करणार्या टोळीचा पर्दाफाश.*
◼️केज पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करून १६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.*
*अनंत जाधव /मस्साजोग
- केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील बोभाटी नदीपात्रात छापेमारी करून अवैध वाळू उपसा करणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे ही कारवाई बीड पोलीस अध्यक्ष राजारामा स्वामी यांच्या पथकाचे प्रमुख* एपीआय विलास हजारे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी केली आहे याप्रकरणी दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती अशी आहे की १६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .१३ फेब्रुवारी शनिवार रोजी काळेगाव घाट लगत असणाऱ्या बोभाटी नदीपात्रातुन अवैधरित्या विनापरवाना बेकायदेशीररित्या वाळू चोरी करून ती विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना वाळूमाफियांना पोलिस अधीक्षक राजाराम स्वामी यांच्या पथकाचे विलास हजारे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी या वेळी दोन ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण १६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालक विकास परशुराम निगुळे काळेगाव घाट ता .केज आणि ट्रॅक्टर मालक श्रीकृष्णा अनुराज जाधव रा .जाधवजवळा ता.केज या दोघांवर कलम ३७९, ३४ भादवीसह कलम १३०( २)१७७ मो.वा .का.गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

COMMENTS