चाकूर: लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले तरुण शिक्षक सुंदरम वांगसकर (२९) यांचे एका भीषण रस्ता अपघातात निधन झाले...
चाकूर:
लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले तरुण शिक्षक सुंदरम वांगसकर (२९) यांचे एका भीषण रस्ता अपघातात निधन झाले. जनगणनेची ड्युटी आटोपून परतत असताना चाकूरजवळ हा अपघात झाला होता. लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुंदरम यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात आणि त्यांच्या मूळ गावी तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, दिनांक १६ मे रोजी दुपारी जनगणनेचे काम संपवून शिक्षक सुंदरम वांगसकर हे जळकोट येथील एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या गाडीने लातूरकडे येत होते. चाकूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या कारने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये सुंदरम वांगसकर हे गंभीर जखमी झाले.
उपचारादरम्यान मृत्यू
अपघातानंतर सुंदरम यांना तातडीने लातूर येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
अत्यंत संघर्षातून मिळवले होते यश; आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा
सुंदरम वांगसकर हे अत्यंत मेहनती आणि अभ्यासू शिक्षक होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला होता. महाराष्ट्र शासनाच्या 'शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' (TAIT २०२२) परीक्षेत त्यांनी उज्ज्वल यश संपादन केले होते. त्यानंतर 'पवित्र पोर्टल' या केंद्रीय प्रणालीमार्फत त्यांची लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नुकतीच नियुक्ती झाली होती सुंदरम हे अविवाहित होते आणि आपल्या आई-वडिलांचे ते एकुलते एक अपत्य (मुलगा) होते. त्यांच्या शासकीय सेवेच्या सुरुवातीलाच काळाने त्यांच्यावर घाला घातल्यामुळे वांगसकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक हुशार, कर्तबगार आणि तरुण शिक्षक गमावल्यामुळे जळकोट आणि चाकूर परिसरातील शैक्षणिक वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS