माजलगाव प्रतिनिधी माजलगाव तालुक्या तील बाभळगाव येथील ग्रामसेवक श्री छगन आजबे हे ग्रामपंचायत कार्यालयात काम करत असताना दिगंबर हरिभाऊ गाडेकर य...
माजलगाव प्रतिनिधी माजलगाव तालुक्या
तील बाभळगाव येथील ग्रामसेवक श्री छगन आजबे हे ग्रामपंचायत कार्यालयात काम करत असताना दिगंबर हरिभाऊ गाडेकर यांनी फिर्यादी मारहाण करून शिवीगाळ केली व यांचे टेबल वरील फाईल फेकून दिल्याची फिर्याद तत्कालीन ग्रामसेवक श्री छगन आजबे यांनी दिली व फिर्यादीवरून आरोपी दिगंबर हरीभाऊ गाडेकर यांचे विरुद्ध कलम 353,323,504, 506 अन्वये पोलीस स्टेशन दिंद्रुड येथे गुन्हा नोंद झाला, सदर प्रकरणाचा तपास करून तपासी अंमलदाराने आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले सदर प्रकरणात पाच साक्षीदार मा. न्यायालयाने तपासले, त्यानंतर सदरचे प्रकरण जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आले माननीय सत्र न्यायालयाने तपासी अंमलदार यांचा जबाब नोंदवला तसेच आरोपीचा जबाब नोंदवला. व त्यानंतर सरकार पक्षा च्या वकिलाचा व आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. दिनांक 15 फेब्रुवारी 2021 आरोपीविरुद्ध सबळ पुरावा न मिळाल्यामुळे आरोपीची मा. पहिले सत्र न्यायधिश श्री ए.एस.वाघमारे साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ऍड. नारायण गोले पाटील, यांनी काम पाहिले.

COMMENTS