◼️नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
दि.१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफ च्या जवानांवर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एकाचवेळी ४० जवान हुतात्मा झाले होते. भारतवासियांसाठी हा एकप्रकारे काळा दिवसच होता. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अद्यापही अोल्याच आहे.त्याअनुशंगाने ग्रामपंचायत कार्यालय अंबुलगा (बु) येथे भारत मातेच्या शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी सरपंचाचे प्रतिनिधी शिवशंकर रॅपनवाड, उपसरपंच शरदराव पाटील, माधवराव मामीलवाड ग्रामपंचायत सदस्य ,युवा पत्रकार विठ्ठल कल्याणपाड, जेष्ठ नागरिक गोविंदमामा मंत्रे, राम मंत्रे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी , कृषी पदवीधर युवा शक्ती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तुकाराम मंत्रे ,निलेश नागमवाड ग्रा.पं. सदस्य प्रतिनिधी, बळीराम कांबळे ग्रामपंचायत सदस्य,संभाजी पाटील, पप्पु कदम ,ग्रामपंचायत सेवक माधवराव आदी जणांची उपस्थिती होती.

COMMENTS