केज प्रतिनिधी.
रमेश इतापे
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुकास्तरीय द्वितीय पारितोषिक विजेता केज तालुक्यातील पाथरा येथील जलदुत ईश्वर करपे व प्रियंका पवार श्रमदानातीसाठी सक्रिय काम केलेली जोडी यांचा विवाह पाथरा येथे सोमवार रोजी संपन्न झाला. वधू-वरांनी गाव परिसरात वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला. विवाहसोहळ्यास ज्ञान प्रबोधनी चे प्रसाद दादा चिक्षे जलदूत जनकराव चौधरी,जि प सदस्या डॉ योगिनीताई थोरात,प स सदस्य शिवाजी चौधरी,तालुका समन्वयक प्रवीण काथवटे, कैलास पन्हाळकर,गणेश राऊत,अशोक भोगजकर, हनुमंत सौदागर,रुस्तुम चौधरी, ऋषिकेश चौधरी,अरुण गायकवाड, मनोराम पवार यांच्यासह पैठण,सावळेश्वर,आनंदगाव,आदी गावातील जलदुत यांच्या कडून आंब्याची रोपे भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. विवाह सोहळा प्रसंगी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केल्याने अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS