*********************
आष्टी (दादासाहेब बन)
आष्टी तालुक्यातील वटनवाडीचे आदर्श माजी सरपंच ,कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा विवेकानंद सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव शिनगीरे यांना वॉक ग्लोबल ह्युमन राइट्स फाउंडेशनचा भगवानराव शिनगीरे यांना इंटरनॅशनल प्रेस्टीजअस अवार्ड हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून 20 जून रोजी त्यांचा मध्य प्रदेश भोपाळ येथे गौरव करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय प्रतिभा सन्मान कॉन्फरन्स 2021 मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राष्ट्रीय प्रतिभा सन्मान गोल्डन पिकॉक पुरस्कार हा राष्ट्रीय पुरस्कार ही जाहिर झाला असून तो 5 जून रोजी मुंबई येथे त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
भगवानराव शिनगीरे हे आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील गेली 20 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे, तसेच वटणवाडी आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासाबाबत त्यांचे भरीव कार्य आहे. निर्मलग्राम राष्ट्रपती पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्ती, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तालुक्यात प्रथम येण्याचा मान, सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी, सानेगुरुजी सुंदर शाळा पुरस्कार, दिल्ली येथे अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल माताप्रसाद यांच्या हस्ते ही त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते ही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार आदी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
तसेच अनेक सेवाभावी संस्था, संघटनेचे, फाऊंडेशनचे ही पुरस्कार मिळालेले आहेत. शिनगीरे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आ.सुरेश धस, आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.भीमराव धोंडे, माजी आ.साहेबराव दरेकर, सभापती दत्तात्रेय जेवे, राम मधुरकर, सतीष धस, दिलीप वायभासे, वैजीनाथ निर्मळ, पञकार उत्तम बोडखे, पत्रकार दादासाहेब बन ,रामदास जाधव, प्रवीण पोकळे, अशोक मुटकुळे, माजी सरपंच अर्जुन मैंद, विष्णू गायकवाड, विठ्ठल शेलार, अमृत कर्डिले, दिनकर मैंद, महादेव मैंद, विजय जाधव, बिबीशन जाधव, समस्त ग्रामस्थ वटणवाडी करांनी व आदिंनी अभिनंदन केले.

COMMENTS