नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
एकीकडे शासनाच्या आदेशानुसार घरकुल लाभार्थ्याना बांधकामासाठी देण्यात येणारी रेती (वाळू) मिळत नसल्यामुळे अनेकांनी घरकुल बांधण्यासाठी काम बंद केले असुन नायगांव तालुक्यात मसूल प्रशासना च्या आशीर्वादाने चोरट्या मार्गाने अनेक दलात आपला धंदा जोमाने सुरू ठेवला असुन नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती नेणा-या एका.हायवा टिप्परवर नायगांव पो.स्टेशन चे पोलिस उप-निरीक्षक श्री.भीमराव कांबळे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, दि.10 जानेवारी च्या रात्री 2:00 वाजता नायगांव येथील सराफा मार्केट मध्ये पाच ब्राश रेतीने भरलेला.हायवा टिप्पर क्र.एम.एच.26.बि.डी.9109 हा रात्री पोलीस गस्त करताना आढळून आला.अधिक चौकशी केली असतांना सदर रेती अवैध मार्गाने चोरटी वाहतूक करण्यात आली असे निष्पन्न झाले आहे. सदर वाहन चालक बालाजी दत्तराम मेथे.वय 23.वर्ष धंदा ट्रक चालक. रा वजीरगाव. ता .नायगाव .व नवनाथ बालाजी मोरे राहणार टाकळी त.ब.यांच्यावर.नायगांव ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भीमराव कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु .र .न .7/2021.रोजी .कलम 379/34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर रेती ची कींमत अंदाजे 20875 .विस हजार आठशे पन्चेहत्तर रुपये पाच ब्रास रेती सह 10.लाख किमतीचा टिप्पर व दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास.पोलीस नायक . गंधपवाड हें आणी सहकारी करीत आहेत.
महसुल प्रशासन मात्र अशा गंभीर बाबीचा विचार करतांना दिसत नाही.

COMMENTS