महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील मान्यवरांना राष्ट्रीय ज्ञानदीप पुरस्कार घोषीत

नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) गेल्या 22 वर्षापासून ज्ञानदीप परिवार यांच्या वतीने सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. हनुमंत भोपाळे यांच्या स...


नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

गेल्या 22 वर्षापासून ज्ञानदीप परिवार यांच्या वतीने सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. हनुमंत भोपाळे यांच्या संकपना आर्णिं पुढाकारातून वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात. या उपक्रमाचा एक भाग म्हणून समाजातील उपक्रमशील अशा व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्काराने सन्मान केला जातो. समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांत असंख्य माणसं सेवाभावीवृत्तीने कार्य करत असतात. त्यांच्या कार्याची नोंद राष्ट्रीय ज्ञानदीप पुरस्कार देऊन घेतली जाते. या पुरस्कारांची निवड समाजातील काही व्यक्तींनी सुचवलेल्या नावातून केलेली आहे.

यावर्षी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील व्यक्तींना राष्ट्रीय ज्ञानदीप पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रीय प्रबोधनकार तथा सप्तखंजीरीवादक सत्यपाल महाराज, सुप्रसिद्ध नाटककार, अनुवादक, पटकथालेखक तथा वक्ते डॉ. सतीशकुमार वर्मा, (पटियाला, पंजाब), हरियाणा राज्यामध्ये परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याचे कार्य करणारे सुप्रसिद्ध वक्ते डॉ. जसबीरसिंघ, कोकण मराठी परिषद गोवाच्या माध्यमातून गोवा राज्यामध्ये मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले सुदेश आर्लेकर (पणजी, गोवा), व्यसनमुक्तीसाठी सतत प्रयत्नशील असलेले प्रबोधनकार ज्ञानेश्वर माऊली सेलुदकर (जालना), मराठी साहित्याला विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जागतिक स्तरावर नेणारे उपक्रमशील असे प्राचार्य डॉ. कौतिकराव ठाले पाटील (औरंगाबाद), वक्तृत्त्व आणि साहित्याच्या माध्यमातून सेवा करणारे सुप्रसिद्धी वक्ते तथा अभिनेते अनिल (एकनाथ) मोरे, परिवर्तनाचा विचार पुढे नेण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक कार्य करणारे मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार (नांदेड), आंबेडकरी विचार मोर्चाच्या माध्यमातून विविध प्रश्नांना वाचा फोडणारे नारायणराव बागडे (नागपूर), आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 40 मुलांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करणाऱ्या सौ. मीरा धनराज कदम (सेवा सदन, हिंगोली), साहित्य, शिक्षण, समाजसेवा आणि संशोधनात्मक कार्य करणारे उत्कृष्ट प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार (जयसिंगपूर), लेखन आणि वाणीच्या माध्यमातून परिवर्तनवादी विचार रूजवण्याचे कार्य करणारे शिक्षणतज्ज्ञ डॉ. बबन जोगदंड (यशदा, पुणे), शैक्षणिक आणि संशोधनात्मक कार्य करणारे प्राचार्य डॉ. राम जाधव (नांदेड), प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले प्रभावी वक्ते तथा संशोधक डॉ. डी.एन. मोरे (नांदेड) यांना ज्ञानदीप पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्र आणि ग्रंथ असे आहे. समाजामध्ये सेवाीावी वृत्तीने काम करणाऱ्या माणसांना बळ देणे, त्यांचा सन्मान करणे हाच हेतू असल्याचे ज्ञानदीप परिवार, दरेगावचे संस्थापक तथा सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. हनुमंत भोपाळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group