बीड प्रतिनिधी झाकीर सय्यद.
बीड शहरातील संत नामदेव नगर भागामधील रहिवासी असणाऱ्या श्रीमती शीला मावशी चव्हाण यांनी गेल्या सात महिन्यापूर्वी लाँक डाऊन च्या काळात देखील अंध-अपंग दीनदुबळ्यांना आपल्या स्वखर्चातून क धान्य किट वाटप केले होते या पाठोपाठच सध्या सुरू असलेले स्वर्गीय झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठान बीड येथे यशवंत नाट्यगृह येथे धार्मिक कार्यक्रम साठी शीला मावशी चव्हाण यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून पाच हजार रुपयांची रोख रक्कम देऊन सामाजिक प्रतिष्ठानला सहकार्य केले आहे या शीला मावशी चव्हाण सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत त्यांना धार्मिक कार्याची खूप आवड आहे तसेच सामाजिक कार्याची पण खूप आवड आहे आणि दीनदुबळ्याचा त्या तर माताच आहेत कारण लाँक डाऊन काळामध्ये त्यांनी स्वतः पन्नास हजार रुपये खर्च करून किराणा सामान घेऊन किरना कीट तयार करून स्वतःच्या घरी या सर्व ना बोलून अंध अपंग अनाथ दीनदुबळे अशा लोकांना या किटचे वाटप मावशीने स्वतः केले यावेळी देखील त्यांची दखल कुठल्याही पेपर वाल्यांनी घेतलेली नाही त्यांनी आज दैनिक न्याय टाइम्स शी बोलताना सांगितले की मी अशा प्रकारची मदत गेल्या सात महिन्यांपासून करत आले आहे आणि आत्ताही केली आहे आणि भविष्यात देखील अशा प्रकारची अंध अपंग यांना मी स्वतःच्या खर्चातून मदत करणार आहे तसेच विविध धार्मिक क्षेत्र कार्यक्रमासाठी देखील मी माझ्या स्वतः खर्चातून मदत करेल अशा भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या म्हणून शीला मावशी चव्हाण यांचे सर्वत्र ठिकाणाहून कौतुक केले जात आहे व अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS