केज, (प्रतिनिधी)
आत्महत्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असून शेतकरी आत्महत्या बरोबरच आता गरीबीत जिवन जगणाऱ्या तरूणांनाही आता जिवन नकोसे झाले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील नाव्होली येथील नाभिक समाजाचे चार ते पाच कुटूंब आपला व्यवसाय करून ऊदारनिर्वाह करत आहेत. यात अशोक गायकवाड यांना जमिन नसल्याने त्यांना दोन मुले असून हे तिघे बापलेक गावातच आपला व्यवसाय करतात. मात्र गरीबी परिस्थिती साथ देत नसल्याने या परिस्थितीला कंटाळून श्रिकांत अशोक गायकवाड वय २१वर्षे या अविवाहित तरूणाने काल दि.११ जानेवारी रोजी सकाळी ७:०० वाजता राहत्या घराच्या पाठिमागे अडचणीच्या ठिकाणी चिंचाच्या झाडाला गळफास लावुन आत्महत्या केल्याने या घटनेची माहिती पो.पा.नवनाथ बिक्कड यांनी पोलिसांना कळवल्याने नांदूरघाट पोलीस चौकीचे जमादार मुकुंद ढाकणे व पो.ना.शिवाजी सानप यांनी तात्काळ घटनास्थळी हजर होवुन घटना स्थळ पंचनामा करून सदरील प्रेत नांदूरघाट ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेहुन शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या घटनेची पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार मुकुंद ढाकणे हे करत आहेत.

COMMENTS