केज दि ११(प्रतिनिधी) तालुक्यातील आनंदगाव येथील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते विठ्ठल कोंडीबा वैरागे यांची कन्या सायली व विलास मिसाळ यांचे ...
केज दि ११(प्रतिनिधी)
तालुक्यातील आनंदगाव येथील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते विठ्ठल कोंडीबा वैरागे यांची कन्या सायली व विलास मिसाळ यांचे सुपुत्र अविनाश या उच्चशिक्षित वधू वरांचा विवाह सोहळा सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला.पारंपरिक विधी,परंपरेला छेद देऊन हे परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकले.प्रा रमेश सरवदे यांच्यामार्गदर्शनाखाली सोहळा संपन्न झाला.
ग्रामीण भागात परिवर्तनवादी चळवळी कणखर होत असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.वधू वर यांना वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून जीवन जगण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.विवाह सोहळ्यास विविध चळवळीतील कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS