धर्माबाद (अहमद लड्डा)
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्हा पालकमंत्री श्री. अशोकराव चव्हाण यांची धर्माबाद येथे भेट होती . येथे त्यांनी क्रीडा संकुल, कस्तूरबा गांधी वस्तीगृह, रेल्वे उड्डाणपूल आणि रिंग रोडचे उदघाटन केले.
हा दिवस धर्माबाद शहर व तालुक्याच्यां लोकांसाठी शुभ होता.
सर्व पक्ष आणि सर्व समाजातील नेते कोणत्याही भेदभावाशिवाय या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यातच कार्यक्रमात पाच महिन्यापासून पगारापासून वंचित असलेले लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल होत होते.येथील काहीं कर्मचाऱ्यानीं मानव अधिकार संसाधन चे मराठवाड़ा अध्यक्ष डॉ. तौफिक पठाण यानां भेटून आपली हकीकत सांगितली व लगेच डॉ पठाण यांनी व्यासपीठावर मंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदन देऊन या विषयावर चर्चा केली. त्याचवेळी मंत्री अशोकराव चव्हाण यांनी विद्यापिठाचे कुलगुरूंशी या विषयावर फोनवर चर्चा केली व या पाच महिन्याच्या पगराच्या समस्ये विषयी सांगितले व कुलगुरु यांनी लगेच होकार देत या सर्व कर्मचाऱ्याचें पगार काढण्याचे मान्य केले. डॉ पठाण मुळे ह्या विषयास पूर्णविराम मिळाला. डॉ पठाण यांच्या प्रयत्नाने या सर्व कर्मचार्यांच्या पगाराची समस्या कायमची मिटली आहे. या सर्व कर्मचार्यांनी डॉ.तौफ़ीक़ पठाण यांचे आभार मानले आहे.डॉ पठाण मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा करतेवेळी माजी आमदार श्री वसंतराव चव्हाण, आमदार राजेश पवार, आमदार अमर राजूरकर, नगराध्यक्षा सौ अफझल बेगम, सत्तार सेठ, नगरसेवक विश्वनाथ पाटील बन्नालीकर, नगरसेवक विनायकराव कुलकर्णी, राष्ट्रवादी नेते हरिहरराव भोसीकर, कॉंग्रेस अध्यक्ष दत्तहरी पाटील चोलाखेकर, संजय बेलगे , बुलढाणा अर्बन कॉर्पोरेशन बँकेचे सुबोध काकाणी, माजी नगरसेवक अंकुश भोसले, शिवसेना संघटक गणेश गिरी, नगरसेवक नागभूषण वर्णी, कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष ताहेर पठाण, शिवसेनेचे आकाश रेड्डी आणि राजेश जाकापुरे सहित सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

COMMENTS