*मनसेची मागणी*
सोनपेठ/प्रतिनिधी
महाराष्ट्राचे ऊर्जामंञी नितीन राऊत यांच्यासह ऊर्जा सचीव व कार्यकारी अभियंता महावितरण यांच्या विरोधात नागरिकांची आर्थिक लुबाडणुक व फसवणुक केली असल्याने त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी मनसेच्या वतीने सोनपेठ पोलिस स्टेशनला पञाद्वारे केली आहे.करोनाच्या महामारीमुळे देशभरात आणि विशेषत महाराष्ट्रात दि.२२ मार्च ते दि.८ जून २०२० दरम्यान अतिकठोर टाळेबंदी होती.या काळात महावितरणकडून ना वीज मीटर रिडिंगसाठी प्रतिनिधी आले ना वीज देयके वितरीत करण्यात आली.घरातच बंदिस्त असलेल्या जनतेला अचानक वापरापेक्षा तिप्पट-चौपट रक्कमेची अवाजवी भरमसाठ वीज बीले पाठवण्यात आली.वीज बीलाचे आकडे इतके मोठे होते की ग्रामीण भागातील व शहरी भागातील मध्यमवर्गीयाना ते भरणे शक्यच नव्हते.मनसे सह इतर राजकिय पक्षांनी नागरिकांची दखल घेत महाराष्ट्राचे ऊर्जामंञी नितीन राऊत यांच्याकडे वीजबिलांबाबतच्या तक्रारी मांडल्या वारंवार वीज कंपन्यांचे आधिकारी यांच्याशी बैठकाही घेण्यात आल्या.या बैठकीत ऊर्जामंञ्यानी वीजबिल कपात करू असे आश्वासन दिले असताना.जनतेला आर्थिक दिलासा मिळाला अशा आशेवर आसताना ऊर्जामंञ्यांनी आचानक घुमजाव केलं आणि प्रत्येकाला वीज भरावीच लागेल असा आदेश काढला.व महावितरणकडून जनतेला दिलासा मिळण्याऐवजी त्यांना आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागत आहे.राज्यातील नागरिकांना-ग्राहकांना अवास्तव अशी भरमसाठ वाढीव वीजबिल पाठवणे,वीजबिलांमध्ये दिलासा देण्याचं खोट आश्वासन देऊन सर्वसामान्य जनतेला महिनोमहिने झुलवत ठेवण आणि शेवटी राज्यातील सर्वसामान्य जनतेला वीज खंडित करण्याच्या धमक्या देवुन बेहिशोबी वीजबिलांची रक्कम वसुल करत असल्याने जनता भयभित होऊन जगत आहे.या सर्वप्रकारे महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंञी नितीन राऊत व महावितरण कंपनीचे प्रमुख आधिकारी हे जनतेची मानसिक लुबाडणुक व फसवणुक करित असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सोनपेठ पोलिस स्टेशनला निवेदनाद्वारे करण्यात आली.या निवेदनावर मनसे तालुकाध्यक्ष नंदकिशोर रोडे,मनविसे तालुकाध्यक्ष मुन्ना बिराजदार,शहराध्यक्ष संदिप कांबळे,बापु कांबळे,भागवत खरात,जितेंद्र कुक्कडे,कृष्णा माने यादी स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS