दिंद्रुड दि.27 (प्रतिनिधी) :-
आजकाल किरकोळ कारणावरून समाजातील वातावरण दूषित होते. त्यामुळे लोकप्रतिनिधीनी सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करावे आवाहन करत शेतातील बांधावरून आपापसातील संबंध खराब करु नका असा मोलाचा सल्ला जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा यांनी दिला.
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा स्वामी यांनी दिंद्रुड पोलीस हद्दीतील तंटामुक्ती अध्यक्ष, शांतता समिती, ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांची बैठक घेत कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी मार्गदर्शन करत संवाद साधला. माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील सर्व पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
जनतेसाठी पोलीस हा सदोदीत काम करतच असतो मात्र जनतेनेही पोलिसांना सहकार्य करत व आपापल्या गावातील शांततेला टिकवण्यासाठी अग्रक्रमाने पुढे आले पाहिजे. बांधावरची भांडणे बांधावरच मिटली पाहिजेत, खोटे गुन्हे दाखल न होण्याची काळजी घेतली पाहिजे, जात धर्म या नावाखाली पितळ पांढरे करणाऱ्यापासुन सावधानता बाळगण्याचे अवाहन पोलिस अधीक्षकांनी या प्रसंगी केले.
पोलीसअधीक्षक आर राजा स्वामी यांचे स्वागत दिंद्रुड पोलिस स्टेशनचे सपोनि अनिल गव्हाणकर यांनी केले. सुत्रसंचलन बंडु खांडेकर यांनी तर आभार फौजदार विठ्ठल शिंदे यांनी मानले. दिंद्रुड, नित्रुड, कासारी, मोगरा, भोपा येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी या बैठकीत पोलिस अधीक्षक आर राजा स्वामी यांचा सत्कार केला.

COMMENTS