*सेलू ,* ( ) नगर परिषदेच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित बँडमिंटन (दुहेरी) क्रीडा स्पर्धेत बुधवारी २७ जानेवारी रोजी प्रकाश झोतात उपांत्य अंतिम सामने घेण्यात आले.
बँडमिंटन दुहेरी क्रीडा स्पर्धेत अंतिम सामना डॉ.आवटे/खरात वि.पांचाळ/कदम यांच्यात अतितटीच्या लढतीत २:१ सेटमध्ये डॉ.आवटे/खरात जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. दुसरे स्थान पांचाळ/कदम ,तर तिसऱ्या क्रमांकच्या सामन्यात पटेल/गुरुबाणी वि. माळवे /कडगे यांच्यात २:० सेटमध्ये पटेल/ गुरुबाणी यांनी तिसरा क्रमांक प्राप्त केला, तर चौथ्या क्रमांकवर माळवे/कडगे यांनी यश प्राप्त केले.
बक्षिस वितरण
परभणी जिल्हा बँडमिंटन संघटनेचे सचिव रवींद्र देशमुख , डॉ.संजय रोडगे, डॉ. संजय हरबडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, मुख्याध्यापक अशोककुमार वानरे, अशोक कासार, उमेश गाडेकर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रंसगी रवींद्र देशमुख म्हणाले, की सेलू शहरातील बँडमिंटन खेळाचे प्रफुल्लित वातावरण पाहून तालुका संघटना बांधणीसाठी सहकार्य करु, तालुक्यात चांगले खेळाडू आहेत, यातून जिल्हास चांगले खेळाडू मिळतील,अशी अपेक्षा व्यक्त केली.
स्पर्धेस नूतन विद्यालय शिक्षण संस्था सरचिटणीस डी.के देशपांडे व सहसचिव डॉ. व्हि.के.कोठेकर यांनी भेट देऊन खेळाडू शुभेच्छा दिल्या.
निकाल असा : प्रथम बक्षिस : डॉ. कैलास आवटे/भाऊसाहेब खरात (रोख पाच हजार व चषक), व्दितीय: शाम पांचाळ / वैशाख कदम ( रोख तीन हजार व चषक.)
तृतीय: प्रतिक पटेल/पुनित गुरुबाणी (रोख दोन हजार व चषक), चतुर्थ:गणेश माळवे/विरेश कडगे (रोख एक हजार व चषक).
प्रास्ताविक संयोजक गिरीष लोडाया, तर सूत्रसंचालन डी.डी.सोन्नेकर, आभार प्रदर्शन सतिश नावाडे यांनी केले.
स्पर्धेत विविध क्षेत्रातील ४७ दुहेरी खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धा यशस्वीतेसाठी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या मार्गदर्शन खाली रामकिशन मखमले, सतिश नावाडे, कुशल कडे,सुनील तोडकर, विशाल क्षिरसागर, सतिश जाधव, रमेश दौड, सचिन कोरडे, कैलास कापुरे, नितीन कापसे, केशव डाहळे, अरुण रामपुरकर यांनी परीश्रम घेतले.पंच म्हणून जितेंद्र घायतडक, सुरज शिंदे, राजेश राठोड यांनी काम पाहिले.

COMMENTS