धर्माबाद (अहमद लड्डा) प्रजासत्ताक दिनानिमित्त साईबाबा प्रसारक मंडळ येताळा संचलित इंदिरा गांधी पब्लिक शाळेमध्ये कोरोनाचे सर्व नियम पालन करत शाळेंचे संचालक येनगोड गंगारेड्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष कोपलोड विठ्ठलरेड्डी हे होते तर प्रमुख पाहुणे सचिव आरगे नरसन्ना ,व्यवस्थापक राजुरेड्डी गडोमोड, संचालक नरसारेड्डी सामोड, मुख्याध्यापक कापसे सुरेश हे होते.
मार्च २०२० मध्ये माध्यमिक परीक्षेत
इंदिरा गांधी पब्लिक स्कूल शाळेमधून
गुणवत्त विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.प्रथम कु. बेलुरकर श्रुती दिलीपराव ९४.२० % , द्वितीय कोंबरे शिवानी राजेंद्र ९३.८० % , तृतीय नरवाडे प्रजक्ता प्रल्हाद ९३.४०% गुण घेऊन उतिर्ण झाले.म्हणुण संस्थेच्या वतीने ५०००/- रोख रक्कम,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शाळेचे खान सर, राजेश बोडगिलवार सर,पांडू कुमार सर,गंभिरे विष्णु, रमेश माळगे,हनमंतु देसाई, यांच्या सह शिक्षक, विद्यार्थी पालक,पत्रकार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बल्लारी सुजाता यांनी केले तर आभार नित्या अय्यर मॅडम यांनी मानले.

COMMENTS