आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व व्यक्ती व घटकांचे मनःपूर्वक आभार.....राहुल डंबाळे
पिंपरी (दि. 28 जानेवारी 2021) तीन वर्षांपुर्वी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीतील संशयीत आरोपींना अटक करावी, या प्रकरणातील तपासासाठी एसआयटीची स्थापना करावी आणि सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यावी. या मागणीसाठी गुरुवारी (दि. 28 जानेवारी) पिंपरी ते मंत्रालय मुंबई दुचाकी रॅली आयोजित करण्यात आली होती हि रॅली रद्द करण्यात आली असल्याची माहिती रॅलीचे मुख्य समन्वयक राहुल डंबाळे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
गुरुवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सुरेश निकाळजे, सुवर्णा डंबाळे, बाबा कांबळे, ॲड. भाई विवेक चव्हाण, बाळासाहेब भागवत, अजिज शेख, शेखर गायकवाड, अनिता सावळे, अंजना गायकवाड, गंगाताई धेंडे आदी उपस्थित होते.
यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना डंबाळे म्हणाले की, 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यातील आरोपींना अटक व्हावी या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित केलेली रॅली रद्द करण्यात आली आहे. बुधवारी (दि. 27 जानेवारी) पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी भीमा कोरेगाव हल्ला विरोधी आंदोलन कृती समितीच्या पदाधिका-यांबरोबर चर्चा केली. या चर्चेनंतर पोलिस प्रशासनाच्या वतीने पुणे ग्रामीण अपर पोलिस अधिक्षक, विवेक पाटील यांच्या सहीचे पत्र समितीला देण्यात आले. या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, या घटनेच्या अनुषंगाने पुणे ग्रामिण पोलिस हद्दीत दाखल तपासावरुन गुन्ह्यांचे पुढील तपास करणेबाबत उप विभागीय पोलिस अधिकारी, दौंड विभाग, दौंड यांचे अधिपत्याखाली एक तपास टिम कार्यरत राहील. कोरेगाव भीमा घटनेच्या अनुषंगाने ज्या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र मा. कोर्टात दाखल झालेले आहेत त्या केसेसची सुनावणी लवकर व्हावी या करीता शासन व मा. न्यायालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल. कोरेगाव भीमा घटनेतील दाखल गुन्ह्यांचे अनुषंगाने ज्यांचेकडे पुरावे आहेत त्यांनी त्यांचेकडील पुरावे मा. पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीण मा. उप विभागीय पोलिस अधिकारी, दौंड विभाग, दौंड यांचेकडे सादर करु शकता. सदरच्या बैठकीत सकारात्मक व समाधानकारक चर्चा झाली. यानंतर भीमा कोरेगाव हल्ला विरोधी आंदोलन कृती समितीच्या पदाधिका-यांनी चर्चा केल्यानुसार रॅली रद्द करण्यात आली आहे.
पोलिस अधिक्षक पुणे ग्रामिण विवेक पाटील यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत राहुल डंबाळे, गोपाळ मोरे, सचिन वाघमारे, सिकंदर सुर्यवंशी, शेखर गायकवाड, अजय मोरे, सुवर्णा डंबाळे, सुरेश निकाळजे, अनिता सावळे, गंगाताई धेंडे, मेघा आठवले, अजिज शेख आदींनी सहभाग घेतला होता.
या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व व्यक्ती व घटकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात येत असून यापुढील काळातही आपण अशाच प्रकारचे सहयोग कराल अशी अपेक्षा राहुल डंबाळे यांनी व्यक्त केली.
------------------------------------------
राहुल डंबाळे (मुख्य समन्वयक भीमाकोरेगाव हल्ला विरोधी आंदोलन समन्वय समिती) --- 9822917119.

COMMENTS