अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटने चे 'सहविचार सभा' कार्यक्रम संपन्न
धर्माबाद (अहमद लड्डा)
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटने ची 'सहविचार सभा' शनिवारी धर्माबाद येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात घेण्यात अली. ज्यामध्ये धर्माबाद जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक नागोराव कमलाकर यांची धर्माबाद तालुक्याच्या अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. स्व.दत्ताहरी जगदंबे यांच्या निधनाने हे पद रिक्त होते. उपाध्यक्षपदी यादव काउलवाड, पंढरी सगर, पल्लेवाड आणि राजेश इंदूरकर यांची निवड करण्यात आली. सल्लागार पदासाठी दत्तात्रय आंबटवार, शिवाजी जंगलेकर, हरिभक्त, वारले व संतोष नाईक यांची निवड झाली.संयुक्त चिटणीस पदावर मोहन भुमकर, दत्तात्रय कांगुलवाड, राम मठवाले, ज्ञानेश्वर वाडीकर आणि एम पी भोसले यांची निवड करण्यात आली. प्रवक्ता म्हणून संतोष वाघमारे सर यांची निवड करण्यात आली. महिला आघाडी प्रमुख पदी सौ वर्षा पाटील, सौ बुतकुरवार मॅडम, सौ ललिता सुपारे आणि सौ नांदगावकर यांची निवड केली गेली व ह्या सर्वांचे पुष्पहार हार देऊन विमल लखमावाड मॅडम यांनी स्वागत केले. कोषाध्यक्ष पदावर राम रेड्डी अडपलवार सर यांची निवड करण्यात आली. कार्यध्यक्ष पदावर विठ्ठलराव चिंचोळकर,सचिवपदी संजय गैनवार तर प्रसिद्धी प्रमुखपदी प्रफुल्ल टाकळीकर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमास व्यासपीठावर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्यध्यक्ष श्री देवीदास बस्वदे, राज्य चिटणीस दिलीपराव देवकांबळे, जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, सरचिटणीस प्रल्हाद राठोड,प्रधानाध्यापक सरचिटणीस प्रभू सावंत आणि मुख्य कार्यध्यक्ष सुधाकर थडके उपस्थित होते यांच्या सोबतच सौ खानापूरकर मॅडम, केंद्रप्रमुख आंदेलवार सर आणि दत्तात्रय आंबटवार हे ही उपस्थित राहिले. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाली. सर्व मानवारांचे शाल व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या व्यवस्थापन समिति च्या अध्यक्षा सौ शेख तस्लिम मॅडम, रामपूर जि प शाळेचे नंदकुमार राजमल्ले सर व धर्माबाद जि प प्रशालेचे सुहास मुळे सर यांचे विशेष सत्कार करण्यात आले. कार्यक्रमात मास्क आणि सोशल डिस्टसिंग ची पूर्णपणे काळजी घेण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुंडलिक गोपतवाड सर, मदनूरकर, इंदूरकर, शिवाजी जंगलेकर, संतोष नाईक, बोधनकर, सौ विमल, लखमावाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात महिला शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व महिला शिक्षिकांनी या संघटनेला पाठिंबा ही दिला आहे.कार्यक्रमात प्रास्ताविक करताना सुहास मुळे यांनी सांगितले की ही संघटना एक चळवळ आहे.आपण येथे आपल्या अडीअडचणी व समस्या मांडावेत ह्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सुपारे मॅडम यांनी आपले विचार मांडताना सांगितले की ही संघटना पूर्णपणे एक महासागर आहे.सुधाकर खडके यांनी सांगितले की जुनी पेंशन योजना मिळवून देण्यासाठी ये संघटना प्रयत्नशील आहे. बदल्यामध्ये सुधारणा व पगार वेळेवर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत व ह्याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा पण झालेली आहे.ह्या संघटने मुळे धर्माबाद तालुक्यात क्रांती होईल असे ही त्यानी स्पष्ट पणे सांगितले.जिल्हासचिव प्रल्हाद राठोड यांनी सांगितले की जुनी पेन्शन योजनेसाठी तालुक्या पासून ते दिल्ली च्या जंतर मंतर येथे ही ह्या संघटनेने आंदोलने व उपोषणे ही केली आहे.आम्ही दूर असलो तरी ही फोन द्वारे संपर्क करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतो.ह्या संघटनेत येऊन चूक झाली अशी वेळ कोणावर ही येणार नाही.फक्त आपण वेळ द्या.कोणत्याही सभासदांना पैसे मागितले जाणार नाही. चहा ही न पिता ही संघटना घरापर्यंत जाऊन सेवा देण्याचे कार्य करत आहे.ह्या संघटनेच्या माध्यमातून बरेच उपक्रम राबविले जात आहे.सहकारी पतपेढी शिक्षकांसाठी संजीवनी आहे असे ही ते म्हणाले. राज्य चिटणीस दिलीपराव देवकांबळे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की देशाच्या स्वातंत्र पूर्वी ची ही संघटना असून शिक्षकांना न्याय देण्याचे कार्य करत आहे आणि हे प्रामाणिक शिक्षक संघटना आहे.जूनी पेंशन चा लढ्याचा मुद्दा लोकसभा व संसदेत मांडला गेला पाहिजे. ह्यामुळे सर्व शिक्षकांना फायदा होईल.राज्यध्यक्ष देविदास बस्वदे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की जागतिक संघाशी संलग्नित ही संघटना आहे. देशाच्या 28 राज्यात ही संघटना कार्यरत आहे. ज्यामध्ये 33 लाख सभासद आहेत.हे संघटनेचे काम हे चालतच राहणार आहे.नोकरी टिकवण्यासाठी चळवळ आवश्यक आहे.शासनाचे दररोज नवीन नवीन जी आर येत आहेत. राष्ट्रीय शिक्षक धोरणाची अमलबजावणी झाली आहे. संघटने ने जुनी पेंशन योजनेसाठीसाठी पूर्ण भारतात लढा दिला आहे. संघटने ने दिल्ली येथे 21 दिवस धरणे आंदोलन ही केले आहे.नवीन शिक्षकांना सुध्दा याचा फायदा होईल ह्या साठी संघटना कार्य करीत आहे. संघटने ने जालना येथे आरोग्य मंत्र्यांना भेटल्या च्या नंतर कोविड आजाराचा बिलामध्ये समावेश करण्यात आला आहे. संघटनेने टिटवाळा येथे 4 एकर जमीन घेऊन येथे वास्तू निर्माण करण्यासाठी ही कार्य होत आहे.अतिथी निदेशकांच्या नेमणुकीच्या मागणीचे देखील आमच्याकडे निवेदन आले आहे व यांच्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहे.कार्यक्रमा नंतर सर्वांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा