नायगाव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
संत रोहिदास यांच्या जयंती दिनानिमित्त दरवर्षी शासकीय सुट्टी शासनाने जाहीर करावी अशी मागणी संत रोहिदास युवा मित्रमंडळाच्या वतीने तहसीलदार नायगाव यांच्या कडे एका निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
संत रोहिदास यांच्या जयंती सबंध भारतभर व विदेशातही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. परंतु केंद्र अथवा राज्य शासनाने अद्याप त्यांच्या जयंती दिनी निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. दि. २७ फेब्रुवारी या रोजी संत रोहिदास यांच्या जयंती येत आहे. या वर्षी पासून जयंती दिनी निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी येथील संत रोहिदास युवा मित्रमंडळाच्या वतीने तहसीलदार नायगाव यांच्या कडे एका निवेदन केली आहे.
या निवेदनावर मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, नागेश भालके, राजू वाघमारे यांच्या सह्या आहेत.

COMMENTS