मुंबई दि.११: भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्या दुःखद निधनाने कामगार चळवळीतील एक बुलंद आवाज हरपला,अशा भावपूर्ण शब्दात कामगारनेते,माजी राज्य मंत्री, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांनी आदरांजली वाहिली आहे.
कामगारनेते सूर्यकांत महाडिक यांच्या दुःखद निधनाची बातमी आजच संध्याकाळी सर्वत्र पसरुन कामगार वर्गात शोककळा पसरली आहे.
सूर्यकांत महाडीक यांच्या आकस्मिक निधनाने कामगार क्षेत्रातील लढाऊ बाण्याचा मुकूटमणी हरपला. तसेच भारतीय कामगार सेनेचा लढाऊ, झुंजार कामगार नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे, असा शोक व्यक्त करून सचिन अहिर यांनी म्हटले आहे, त्यांच्याशी माझे या पूर्वी पासून मैत्रीचे संबंध राहिले आहेत. कामगार चळवळीत त्यांनी कधीही पक्षीय मतभेद ठेवले नाहीत.राष्ट्रीय स्तरावरही त्यांचे कामगार चळवळीतील कार्य आदर्शवत ठरले आहे. केंद्र सरकारने कामगार विरोधी धोरणे अवलंबिली.त्या विरोधी सर्व राष्ट्रीय कामगार संघटना एकत्रित येऊन लढा उभा केला गेला.त्या मध्ये सूर्यकांत महाडिक यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे, असेही सचिन अहिर यांनी शोकव्यक्त करताना म्हटले आहे.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यानीही सूर्यकांत महाडिक यांच्या दुःखद निधना बद्दल शोक व्यक्त करुन एक लढवय्या कामगार नेता हरपला असे म्हटले आहे.
★★काशिनाथ माटल★★

COMMENTS