मुखेड प्रतिनिधी / पिंजारी मुस्तफा
गेल्या दहा वर्षांपासून बेटमोगरा ग्रामपंचायतीच्या कारभार
तात्कालीन सरपंच व विरोधी ग्रामपंचायत सदस्यांच्या हाती असुन सुद्धा शासनाचा प्रत्येक निधिचा टक्केवारीच्या हिशोबाने अपहार करणाऱ्यांची टोळी पुन्हा निवडणूकीत सक्रिय झाली असून अशा मँनेजमेंट टोळीपासुन जनतेनी सावध रहायली पाहिजे अशी प्रतिक्रिया स्वराज्य ग्रामविकास परिवर्तन पॅनल बेटमोगरा चे प्रमुख बालाजी शंकरराव पाटील बेटमोगरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी व्यक्त केले.
मुखेड तालुक्यात होत असलेल्या १०८ ग्रामपंचायत निवडणूकीत ६ ग्रामपंचायतीची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित ग्रामपंचायत निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे. यात बेटमोगरा ह्या ग्रामपंचायत निवडणुकीत तिन पँनल मध्ये काटे कि टक्कर होणार असून प्रत्येकाने आपल्या पँनलला बहुमत मिळवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत.
बालाजी शंकरराव पाटील बेटमोगरेकर पुढे बोलताना म्हणाले की,बेटमोगरा ही एक बहुचर्चित गाव असुन येथील गेल्या दहा वर्षांपासून तात्कालीन सरपंच व विरोधी ग्रामपंचायत सदस्यांचा हाती सत्ता असूनही गाव विकासापासून कोसो दूर गेला आहे.तसेच दिव्यांग निधी वाटपात लूट तर कधी रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनाच्या लाभार्थ्यांकडून पाच पाच हजार तर शौचालयाची बिले काढून देण्यासाठी दोन दोन हजार रुपयांची आर्थिक लूट केली व शासनाच्या अनेक निधीपासून गोरगरिबांना वंचित ठेवून स्वत:च्या विकास करणारी टोळी पँनल च्या नाव बदलून पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय झाली असून अशा मँनेजमेंट टोळीला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी व आरोग्य, शिक्षण,कृषी क्षेत्रातील संधीचा विकासासह घरकूल, रस्ते,नाल्या,मोफत शुद्ध पाणी अशा अनेक बाबतीत गावच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी येणाऱ्या १५ जानेवारी रोजी स्वराज्य ग्रामविकास परिवर्तन पॅनल च्या सर्व उमेदवारांना स्पष्ट असे बहुमत देऊन विजयी करा असे आवाहन स्वराज्य ग्रामविकास परिवर्तन पॅनल चे प्रमुख बालाजी शंकरराव पाटील यांनी ग्रामस्थांना केले.

COMMENTS