*केज,धारूर, अंबाजोगाई ला रोज ये _ जा करणाऱ्या नागरीकांना मनक्याचे आजार.*
*अनंत जाधव /मस्साजोग :-
*केज तालुक्यातील चंदन *सावरगाव ते केकत सारणी,उदरी, मानेवाडी , कळमअंबासह अनेक गावांमधे रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून गेली कित्येक* दिवसापासून ग्रामीण जनता या खराब झालेल्या रस्त्यावरून वावरत आहे. अनेक नागरीकांना खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही . या अश्या रस्त्यामुळे अनेकांना मन क्याचे आजार झाले आहेत . याचा मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे, अजूनही ग्रामीण रस्त्यांच्या विकासाकडे पाहिले जात नाही ग्रामीण रस्ते दुरुस्तीची प्रतीक्षा करतच आहेत नेत्यांना लोकप्रतिनिधीनो या ग्रामीण भागाच्या रस्त्याने जर फिरकून पहा मग पहा कसा भयानक त्रास सहन करावा लागतो , काही भागातील ग्रामीण रस्त्यांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कित्येक रस्त्यांना मंजुरी मिळालेली आहे काहींना तर अजून मंजुरी मिळालेली नाही कित्येक दिवसापासून या काही भागातील रस्त्यांना मंजुरी मिळालेली नाही त्यांना का मंजुरी मिळालेली नाही ते ग्रामीण भागात राहतात हा त्यांचा गुण दिसून येतो की काय ? ग्रामीण भाग असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते . काही रस्त्यांना तर मंजुरी मिळालेली असूनही मात्र त्यां रस्त्याच्या कामांना कधी मुहूर्त लागणार असा प्रश्न निर्माण होत आहे. नेत्यांनो या ग्रामीण भागातील रस्त्याकडे उघडा डोळेअन पहा नीट ?
राज्यात महामार्गाच्या रस्त्यांचा चांगल्या प्रकारे विकास होताना दिसत आहे, हे खरे आहे ,यात शंका नाही, मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची खूप मोठी दुर्दशा झालेली असून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे गेल्या कित्येक दिवसापासून केज व अंबाजोगाई रोडवरून चंदनसावरगाव मार्गे केकतसारणी,उदरी, या रस्त्यांचा विकास खुंटला आहे 10-15 किलोमीटर पर्यंत या रस्त्यांची दुरवस्था पाहायला मिळत आहे सर्व रस्ते उधडलेल्या अवस्थेत आहेत सध्याच्या परिस्थितीत प्रशासनाकडून ठराविक रस्त्यांसाठीच निधी मंजूर केलेले आहेत खराब झालेल्या या रस्त्यांनी नागरिकांनी कसा प्रवास करावा ? काही ठिकाणी वाहनांना जाता येईना तर काही ठिकाणी नागरिकांना सुद्धा चालता येईना ? अशी ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस नागरिकांना या रस्त्याची झळा सोसावी लागत आहे, प्रवास करताना आपला जीव मुठीत धरून त्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो काही ठराविक गावांनाच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा निधी मंजूर केला राज्यातील इतर ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास कोण करणार किती दिवसापासून काही गावांची रस्ते विकासापासून वंचित आहेत एका पंधरा मिनिटाच्या रस्त्यासाठी नागरिकांना दोन तास लागतात असे असल्याने काही वेळा जो पेंशट वाचू शकतो मात्र या खराब रस्त्यामुळे वेळत न दवाखान्या मंध्ये पोहचता न आल्यामुळे दगावली आहेत . या ग्रामीण भागाचा विकास कधी होणार डिजिटल भारतात ग्रामीण रस्ते अजूनही दुरुस्त केले नाहीत तर कसा जनतेचा विकास होणार व काही ठराविक लोकप्रतिनिधींनी ठाराविक गावाची चेहरे पाहून थोडीशी धडपड करून मोजक्याच गावांना निधी मंजूर केला मोठ्या थाटामाटात निधी मंजूर केले च्या घोषणा पत्रकबाजी व बातम्या छापून आल्या मात्र अजूनही त्या गावच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झालेला नाही या रस्त्याची कामे कधी सुरू होणार कधी या रस्त्यांच्या कामांना मुहूर्त मिळणार व नागरिकांना दिलासा मिळेल या मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाच्या मुहूर्त कधी मिळणार ? प्रशासन कधी तत्परता दाखवणार असा सवाल निर्माण होत आहे .
ग्रामीण भागात एवढे रस्ते खराब झालेले आहेत की कित्येक वर्षापासून जनता या खराब रस्त्यांचा त्रास सहन करत आहे वेळोवेळी प्रशासन व लोकप्रतिनिधी कडे या ग्रामीण रस्त्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे कारण या रस्त्याची झळा नेत्यांना प्रशासनास नाही तर याची मोठी समस्या या ग्रामीण वासियांना सोसावी लागत आहे मात्र या ग्रामीण भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले जाते जनतेमध्ये सुशिक्षित व जागृतीचे प्रमाण वाढले असून जनता जागृत झाली आहे यावेळी ते भूलथापा देणाऱ्या पुढार्यांना व नेत्यांना चांगलाच धडा शिकवणार असल्याचे चित्र दिसत आहे
महाराष्ट्रात गेली कित्येक दिवसापासून ग्रामीण रस्ते दुरुस्ती ची प्रतीक्षा करत आहेत मात्र त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते आज सध्याच्या परिस्थितीचे चित्र पाहिले तर ग्रामीण भागात जनता दैनंदिन जीवन जगत असताना या खराब रस्त्यामुळे त्यांचा विकास झालेला नसून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे विविध पक्ष आणि पार्ट्यांच्या राजकारणात ही गावे विकासापासून वंचित राहतात एखाद्या पार्टीच्या लोकप्रतिनिधींची सत्ता आली की त्यांनी पाच वर्षात फक्त आपली पुढारी आपले नेते त्यांच्याच गावची रस्ते व त्याचाच विकास करण्याकडे त्यांचा भर दिसून येतो एखाद्या रस्त्याची खरोखरच दुरुस्तीची गरज असते मात्र त्यांच्या या रस्तेदुरुस्ती कडे दुर्लक्ष केलेले दिसून येते असे या राजकारनिय परिस्थिती सुरू आहे या ग्रामीण जनतेच्या विकासासाठी यामध्ये खरोखरच कोणत्या गावात रस्ते अथवा इतर सोयी सुविधांची खरोखरच गरज आहे हे पहावे व सर्वे करून ग्रामीण भागाचा विकास करावा.
थातूर-मातूर रस्ते नको
ग्रामीण भागात कित्येक दिवसापासून रस्त्याचे विकासाकडे पाहिले जात नाही एखाद्या ठराविक वेळी एखाद्या लोकप्रतिनिधीच्या पुढाकाराने एखाद्या रस्त्यास निधी मंजूर झाला तर मोठा गाजावाजा करतात पत्रक काढतात वर्तमानपत्रात बातमी छापून येतात हे सर्व करून मोठी प्रसिद्धी केली जाते निधीचे आकडेही लाखो-कोटीत असतात मात्र ही ग्रामीण रस्ते दुरुस्त करत असताना थातूर-मातूर रस्त्याची कामे केली जातात व नंतर सहा महिन्यातच रस्त्याची दुर्दशा होते असे थातूर-मातूर रस्ते करण्यापेक्षा एकदाच संपूर्ण बजेट मध्ये रस्ते दर्जेदार करून दाखवले तर ग्रामीण भागाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही
. पुढारी नेते मंत्री खेड्यापाड्यांचा कानाकोपऱ्यात गावात वस्तीवर तांड्यावर शेतापर्यंत धावपळ करताना दिसून आली . तेथे जाऊन त्यांची भेट घेतात मात्र निवडणुकीनंतर पाच वर्षे त्यांच्याकडे फिरकूनही पाहत नाहीत तर त्यांचे विकासाचे मुद्दे तर दूरच राहतात निवडणुकीदरम्यान तुमची धावपळ होती तशी पाच वर्षातून ग्रामीण विकासाकडे तुमची धावपळ होताना दिसत नाही त्यांना ध्यास लागला आहे की तुम्ही त्यांच्याकडे येणार त्यांना भेटणार त्यांच्या समस्या जाणून घेणार त्यांचे विकासाकडे पाहणार यासाठी तुमची चरण त्यांच्या ग्रामीण भूमीवर लागणार मात्र चार-पाच वर्षांपासून निवडणुकीनंतर त्यांच्याकडे तुम्ही फिरवूनही पहात नाहीत हे खरे मात्र विकास कोणते नेत्यांनी केला आहे अशा मुद्द्यांचा विचार करून जनता पसंती ठरवणार हे त्यांनी नेत्यांनी विसरू नये यासाठी तूम्ही ग्रामीण भूमीवर जा त्यांच्या समस्याजाणून घ्या तुमचे पाय त्यांच्या भूमीवर लागू द्या
रस्त्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास
राज्यात रस्त्याचा विकास म्हणजे देशाचा विकास असे आपण खूप दिवसापासून ऐकत आहोत मात्र गेली कित्येक दिवसापासून हा रस्ता नादुरुस्त आहे.जनता रस्त्याच्या विकासा साठी तरसलेली आहे आहे कधी या रस्त्यांचा विकास होणार असा प्रश्न निर्माण होत आहे .
रस्ता अत्यंत खराब झाला आहे तेथे प्रशासनाने लक्ष घालून लवकरात लवकर डांबरीकरण करावे. असे केकत सारणी गावाचे युवा नेते गोविंद केंद्रे यांनी मागणी केली आहे.


COMMENTS