नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार)
मूकबधिर दलित समाजातील 30 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी नायगांव येथील रविदास मित्र मंडळाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिली.
बिलोली येथील सदर घटनेचा सर्वत्र निषेध होत असून मारेकर्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी समाज व विविध संघटनेचे कार्यकर्ते एकवटले आहेत. ही वार्ता ऐकल्यानंतर कोणाचेही मन हेलावणारच अशी निर्दयी कृत्य करून आरोपी मोकाट असल्याने त्यांना त्वरीत अटक करून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी रविदास युवा मित्र मंडळाच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी हवेलीकर, पांडुरंग हवेलीकर नारायण हवेलीकर, मोहन गंधारे ,साईनाथ पांचाळ, सुरज हवेलीकर ,राजू वाघमारे, संदीप भालके, संतोष हवेलीकर, यांच्या नेतृत्वाखाली नायगांव तहसीलदार यांना कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले आहे.

COMMENTS