अनंत जाधव /मस्साजोग -
अनेकदा पती सोबत नसल्याने महिलांना एकट पडल्यासारखं वाटतं अशा वेळेस महिला अनैतिक संबंधाच्या दिशेकडे खेचल्या जातात. एकटेपण घालवण्यासाठी त्या या मार्गावर गेलेल्याचे अनेक उदाहरने आहेत. तर काही ठिकाणी पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन वाद होतात जर याचा परिणाम संबंधावर झाला तर दोघांमध्ये कधीच जुळत नाही. दोघेही एकमेकांशी संबंध ठेवण्यासही नकार देतात त्यामुळेही सुखी संसाराला घरघर लागते. याशिवाय पैशाचा मोह हा आताच्या काही महिलांमध्ये वाढल्याने ते बाहेर अनैतिक संबंध ठेवतात अशा अनेक घटना देखील समोर येत आहेत. तर काही ठिकाणी पती दुसरिकडे तोंड मारतोय मग आपण पण गप्प का बसायचे असे म्हणून देखील महिला अनैतिक संबंध ठेवतात. मात्र पती असो वा पत्नी यांनी ठेवलेले अनैतिक संबंध हे वाईटच असतात आणि त्याचा शेवट पण वाईट होतो हे त्रिकाल सत्य सातत्याने समोर आले आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून दयानंदने ‘विभक्त’ मिरा हेरली, कुस्कारली ! अन् जेव्हा तिने पोरीच्या लग्नाला पैसे मागितले तेव्हा जिवानिशी मारल्याची धक्कादाय घटना समोर आली.
केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोका नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावातील इनकर यांची मुलगी मिराबाई हीचा विवाह गेल्या अठरा वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील माधवनगर सटाण्याचा मळा येथील बाबू रंधवे यांच्यासोबत झाला. त्यांच्या सुखी संसारावर दोन सोन्यासारखी फुलंही उमगली. काही वर्षे त्या दोघांचा सुखी संसार सुरू असतानाच बापू रंधवे आणि मीराबाई यांचे किरकोळ कारणावरुन भांडणं होऊ लागली. त्यामुळे दोघांचे पटत नसल्याने गेल्या चार वर्षापासून मिराबाई या आपल्या माहेरी म्हणजे केज तालुक्यातील डोका येथे राहू लागल्या. यादरम्यान मीराबाईचे पती बापू रंधवे हे १ वर्षापूर्वी एका पोस्को गुन्यात जेलमध्येे गेले. त्यामुळे मीराबाई आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्या सासरी म्हणजेच संागली येथे गेल्या. मात्र मीराबाई माहेरी असताना गेल्या तीन वर्षांपूर्वी त्यांचे केज पोलीस ठाणे हद्दीतील मस्साजोग येथील दयानंद भीमराव गायकवाड वय ४० वर्ष यांच्याशी ओळख झाली होती. मीराबाईची नातलग दयानंद गायकवाड यांच्या घरी कामाला असल्याने तिच्यासोबत मिराबाई ह्या गायकवाड च्या घरी कामाला जात असत यादरम्यानच त्यांचे गायकवाड यांच्याशी संबंध आल्याने याचे प्रेमात रुपांतर झाले. मात्र पती जेलमध्ये गेल्याने आपल्या मुलाला सांभाळण्यासाठी ती सासरी गेली होती.सासरी गेल्यानंतरही मिराबाई ह्या दयानंद गायकवाड यांना सारखा फोन करत होती. त्यावेळी मीराबाईची शहाणी सुरती लेेक मिराबाईला म्हणायची तू कोणाला फोनवर बोलतेस? त्यावेळी मिराबाई म्हणायची तुझ्या लग्नाला ते आपल्याला पैसे देणार आहे. त्यासाठी मी त्यांना बोलते. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी मिराबाई ह्या पैसे आणते आणि आत्याच्या वर्ष श्रद्धालाही जावून येते म्हणून माहेरी डोका येथे गेली.
त्यानंतर दिनांक २४ नोव्हेंबर २०२० रोजी मीराबाई, तिची मुलगी आणि कांताबाई इनकर ह्या मीराबाईच्या आत्याच्या वर्ष श्रद्धासाठी लागणार्या सामानाची खरेदी करण्यासाठी केज येथे गावातील रामराव भांगे यांच्या रिक्षात गेल्या. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मिराबाई रंधवे व कांताबाई इनकर ह्या त्र्यंबक इनकर म्हणजेच मीराबाईचे चुलते त्यांना भेटल्या तेव्हा त्यांनी खरेदी केलेली होती. त्यावेळी मिराबाई आपल्या चुलत्याला म्हणाल्या की ‘तुम्ही बाजार घेऊन गावाकडे जा, मी हार व तुमच्यासाठी आणि भाऊजीसाठी कपडे घेऊन येते’ असे म्हटल्यानंतर चुलते त्र्यंबक इनकर हे गावाकडे गेले. संध्याकाळचे आठ वाजले तरी देखील मिराबाई घरी आल्यानसल्यामुळे कांताबाई इनकर यांनी त्र्यंबक इनकर यांना सांगितले. मिराबाई अजून आली नसल्याने तिचा फोन लावला असता तिचा फोन लागत आहे, परंतू ती फोन उचलत नाही. अनेक वेळा त्र्यंबक इनकर यांनी मिराबाई ला फोन केला नातेवाईकाला फोनवरून विचारपूस केली मात्र कोठे मिळून आली नाही. त्यामुळे ते तिची वाट पाहून रात्री झोपी गेले. दुसर्या दिवशी म्हणजेच दिनांक २५ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी दोन वाजता त्र्यंबक इनकर यांची भाऊजाई ही गावातील रामचंद्र सोपान भांगे यांच्या शेताकडे ओरडत पळत गेली. तेव्हा त्र्यंबक इनकर व त्यांची पत्नी आणि पुतणी हे ती का पळते? म्हणून तीच्या मागे पळत गेले असता रामचंद्र भांगे यांच्या तुरीच्या शेतात जाऊन पाहणी पाहिले असता. तिथे मिराबाईच्या तोंडावर दगड मारुन तोंडांचा चेंदामेंदा करुन गळा चिरुन कोणीतरी खून गेल्याचे आढळून आल्याने नातेवाईकांनी एकच आरडा ओरड केली.
घटनेची माहिती केज पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा सविस्तर पंचनामा केल्यानंतर ते प्रेत मिराबाई बापू रंधवे (वय ४२ वर्षे, रा.माधवनगर सटाण्याचा मळा, सांगली) हीचे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर मयत मिराबाई बाबू रंधवे यांचे चुलते त्र्यंबक तात्याबा इनकर यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात दि. २४ नोव्हेंबर २०२० रोजी संध्याकाळी सात ते दि. २५ नोव्हेंबर २०२० रोजी च्या सकाळी ११ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यांची पुतणी मीरा बाबू रंधवे हिला जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने गळा कापून व तोंडावर दगडाने ठेचून जीवे ठार मारले म्हणून अज्ञात व्यक्तीविरोधात कायदेशीर फिर्याद नोंदवली. त्यानंतर केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, केजचे पोलीस उपअधिक्षक भास्कर सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवली. त्यावेळी मयताच्या शेजारी अभिजित ड्रेसेस नावाच्या दोन पिशव्या मिळून आल्या आणि त्या दोन पिशव्याचा मागावा काढत केज पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला त्यावेळी जप्त करण्यात आलेल्या वस्तूंपैकी अभिजीत ड्रेसेस नावाच्या दोन पिशव्या मिळून आल्या होत्या. त्यामधील बिल पावती वरून अभिजीत ड्रेसेस दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासून यातील मयत मीराबाई बाबू रंधवे तिच्या अंगातील घटनास्थळावरील साडीच्या वर्णनावरून (कारण तिचा चेहरा दगडाने ठेचल्यामुळे ओळखू येत नव्हता) तिच्यासोबत एक अनोळखी इसम खरेदी करत असल्याचे दिसत असल्याने पोलिसांनी सिसिटिव्ही फुटेज दोन पंचा सक्षम जप्त केले. सदर फुटेजवरून यातील मयत महिलेचे नातेवाईक कांताबाई इनकर यांनी अभिजित ड्रेसेस मधील फुटेजवरून मयत महिलेला ओळखून तिच्या सोबत असलेला अनोळखी इसम हा दयानंद भीमराव गायकवाड (वय ४० वर्षे, रा.मस्साजोग) येथील असल्याचे सांगितले. तसेच श्रीकृष्णा बळीराम सारूक (वय २९ वर्षे, व्यवसाय रिक्षाचालक) याने जबाबामध्ये सांगितले होते की, दि. २४ नोव्हेंबर २०२० रोजी संध्याकाळी सहा ते सव्वा सहा दरम्यान मयत मीरा रंधवे व तिच्या सोबत एक अनोळखी इसम या दोघांना रिक्षाने केज येथून डोका गावी सोडल्याचे सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी दयानंद भीमराव गायकवाड याला २६ नोव्हेंबर २०२० रोजी ताब्यात घेतले आणि त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरील गुन्हा केल्याची कबूली पोलिसांसमोर दिली.
मयत मिराबाई ही आपल्याला सारखे पैसे मागत होतो. तिच्या मुलीच्या लग्नाला ती मला पैसे मागत होती. माझ्याकडे तिला द्यायला पैसे नव्हते म्हणून आपण हे कांड केले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर यामध्ये ऍट्रॉसिटी नुसार कलम वाढवण्यात आले आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी केला. यामध्ये त्यांना वरिष्ठ पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, केज उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक भास्कर सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. तर या तपासात त्यांना पीएसआय श्रीराम काळे, अशोक नामदास, शेख मतीन, अमोल गायकवाड, अशोक गवळी यांचे सहकार्य मिळाले. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

COMMENTS