नांदेड:राज्यात सध्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठ...
नांदेड:राज्यात सध्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात 'महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंध कायदा १९८२' लागू करण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
महत्त्वाचे पेपर आणि खबरदारी शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २५ फेब्रुवारी रोजी १२ वीचा जीवशास्त्र (Biology) आणि २७ फेब्रुवारी रोजी १० वीचा इंग्रजी विषयाचा पेपर आहे. या महत्त्वाच्या पेपरच्या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांवर दक्षता वाढवण्यात आली आहे. उद्यापासून होणाऱ्या सर्वच पेपरसाठी हा कायदा कडकपणे राबवला जाणार आहे.
कायद्यातील प्रमुख कलमे आणि शिक्षा:
पत्राद्वारे सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि परीक्षा केंद्रांना या कायद्यातील कलमांची माहिती देण्यात आली आहे:
जर एखाद्या खाजगी कोचिंग क्लास किंवा शाळा प्रशासनामार्फत गैरप्रकार होत असेल, तर त्या संस्थेच्या प्रमुखालाही जबाबदार धरले जाईल. तसेच, परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज जाणूनबुजून नष्ट केल्यास किंवा न दिल्यास तो पुराव्याशी छेडछाड केल्याचा गंभीर गुन्हा मानला जाईल.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तथा सदस्य सचिव, जिल्हा दक्षता समिती यांनी ही नियमावली जारी केली असून, सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य आणि संस्था सचिवांना याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

- कलम ३ (प्रश्नपत्रिका गोपनीयता): प्रश्नपत्रिका फोडणे, ती अधिकृत वेळेपूर्वी मिळवणे किंवा सोशल मीडियावर पसरवणे हा गंभीर गुन्हा आहे.
- कलम ४ (कामात अडथळा): परीक्षा कर्मचाऱ्यांना धमकावणे किंवा कामात अडथळा आणल्यास कारवाई होईल.
- कलम ५ (उत्तरपत्रिका छेडछाड): विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहिणे, बदलणे किंवा कोरी पाने जोडणे यावर बंदी आहे. परीक्षकांनी कॉपी करण्यास मदत करणे हा देखील गुन्हा मानला जाईल.
- कलम ७ (शिक्षेची तरतूद): दोषी आढळल्यास ३ महिने ते १ वर्षापर्यंतचा कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. हा गुन्हा 'दखलपात्र' आणि 'अजामीनपात्र' आहे, म्हणजेच पोलिसांना विनापरवाना अटक करण्याचे अधिकार आहेत.

COMMENTS